नवरात्रोत्सवामुळे मुंबई नाका व भगूर परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत.  File Photo
नाशिक

नाशिककरांनो ! पुढचे दहा दिवस मुंबई नाका व भगूर परिसरातील वाहतूक मार्गात बदल

Nashik Traffic Route Change | नवरात्रोत्सवामुळे निर्णय, पाहा कोणते मार्ग बंद, कोणते पर्यायी ?

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नवरात्रोत्सवानिमित्त पोलिसांच्या बंदोबस्ताचे नियोजन पूर्ण झाले आहे. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी मुंबई नाका व भगूर परिसरातील वाहतूक मार्गात बदल केले आहेत. कालिकादेवी आणि रेणुकादेवी मंदिर यात्रोत्सवानिमित्त संबंधित मार्ग गुरुवार (दि.३) पासून दसऱ्यापर्यंत (दि.१२) पूर्ण दिवस बंद राहणार आहेत. त्यामुळे वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याची अधिसूचना वाहतूकचे पोलिस उपआयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी काढली आहे.

मुंबईनाका येथील कालिकादेवी मंदिर यात्रोत्सवानिमित्त पोलिसांनी त्र्यंबक नाका सिग्नल, गडकरी सिग्नल, मुंबई नाका टॅक्सी स्टँड, चांडक सर्कल, महापालिका आयुक्त बंगला, शिंगाडा तलाव, संदीप हॉटेल येथे बॅरिकेडिंग उभारले आहेत.

प्रवेश बंद

- गडकरी सिग्नल ते मुंबई नाका टॅक्सी स्टँडपर्यंत दुतर्फा

- चांडक सर्कल ते हॉटेल संदीपपर्यंत दोन्ही बाजूने

पर्यायी मार्ग

१. तिडके कॉलनीतून नंदिनी नदी पुलावरून गोविंदनगरकडे जात तिथून इंदिरानगर, मुंबई नाका, सिटी सेंटरकडे वाहने मार्गस्थ होतील.

२. चांडक सर्कलवरून सीबीएस, शालिमार, सारडा सर्कलवरून वाहने मार्गस्थ होतील.

३. द्वारकाकडून येणारी सर्व वाहने सारडा सर्कलवरून शालिमारमार्गे येतील व जातील.

४. सर्व प्रवासी वाहने, सिटीलिंक बसेस त्र्यंबक नाका सिग्नलवरून गंजमाळमार्गे सारडा सर्कलमार्गे नाशिक रोडकडे मार्गस्थ होतील.

५. हलकी वाहने मुंबई नाक्यावरुन टॅक्सी स्टँडमार्गे तुपसाखरे लॉन्स, चांडक सर्कवरुन त्र्यंबकरोडमार्गे मार्गस्थ होतील.

६. अंबड, सातपूर परिसरात जाणारी जड वाहने द्वारका सिग्नलवरून गरवारे टी पॉइंटमार्गे सातपूर व अंबड एमआयडीसीत जातील.

७. द्वारका सिग्नलवरून पंचवटीत जाणारी जड वाहने कन्नमवार पूल, संतोष टी पॉइंट, रासबिहारी हायस्कूलमार्गे पंचवटीत जातील.

८. सारडा सर्कलवरून गडकरी चौकात येणारी वाहने एन. डी. पटेल रस्त्यावरून जिल्हा परिषदेसमोरील रस्त्याचा वापर करतील

रेणुकादेवी मंदिर यात्रोत्सव, भगूर

प्रवेश बंद

रेस्ट कॅम्प रोड हा चिंतामणी चौफुली ते नाका क्रमांक दोनपर्यंत (दुपारी २ ते रात्री १२ पर्यंत)

पर्यायी मार्ग

भगूर गावातून देवळाली कॅम्पकडे येणारी जाणारी सर्व वाहने रेस्ट कॅम्प रस्त्यावरील जोशी रुग्णालय-स्नेहनगर-पेरुमल मार्ग-टेम्पल हिल रोड-जोझिला मार्ग-रेस्ट कॅम्प रस्त्यावरील सेंट्रल स्कूलमार्गे जातील व येतील. सणोत्सवात हा रस्ता वापरण्यासाठी पोलिस आयुक्तालयाने परवानगी घेतली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT