Police Recruitment
पोलिस भरतीतील गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी File Photo
नाशिक

Nashik| मोठी बातमी ! पोलिस भरतीतील गैरहजर उमेदवारांना पुन्हा संधी देण्याचा निर्णय

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलिस दलातील रिक्त शिपाई पदांसाठी सुरू असलेल्या मैदानी चाचणी परीक्षेस गैरहजर राहिलेल्या उमेदवारांसाठी संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा उमेदवारांनी रविवारी (दि.३०) सकाळी ६ वाजता पंचवटीतील मीनाताई ठाकरे स्टेडियम येथे चाचणीसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातर्फे रिक्त ११८ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबवली जात आहे. त्यानुसार सात हजार ७१७ उमेदवारांनी अर्ज केला आहे. त्यासाठी दि. १९ ते २९ जून या दरम्यान उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली जात आहे. या प्रक्रियेला अखेरचे दोन दिवस राहिले आहेत. काही उमेदवार मैदानी चाचणीस गैरहजर राहिले. त्यामुळे अशा उमेदवारांना शहर पोलिसांनी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार रविवारी सकाळी ६ ते ९ वाजेदरम्यान ठाकरे स्टेडिअम याठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या उमेदवारांना लेखी अर्ज योग्य पुराव्यासह द्यावा लागेल. तसेच, येताना कॉल लेटर, अर्ज, सहा पासपोर्ट फोटो, आधारकार्ड आणि आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती आणण्याची सूचना आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे.

२१३ महिला गैरहजर

गुरुवारी (दि.२७) झालेल्या मैदानी चाचणीसाठी ७५० महिला उमेदवारांना बोलवण्यात आले हाेते. त्यापैकी २३१ महिला उमेदवार गैरहजर होत्या. तर ५१९ उपस्थित उमेदवारांपैकी ८५ उमेदवार उंचीत अपात्र ठरले, तर ४३४ उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.

SCROLL FOR NEXT