निवडणूकीसाठी शिक्षक मतदारांचा उत्साह दिसत असून सकाळापासून मतदारांनी मतदान केंद्रावर रांगा लावल्या आहेत. (छाया : राजेंद्र शेळके)
नाशिक

Nashik| शिक्षक मतदारांचा उत्साह, मतदान केंद्रावर रांगा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक/सिडको : नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत बुधवारी (दि. 26) शिक्षक मतदारांनी सकाळी ७ पासून मतदान केंद्रावर गर्दी केली. मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे .

नाशिक शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत विभागात पाचही जिल्ह्यात मतदानास सुरवात झालेली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजे पर्यंत मतदान होणार आहे.

नाशिक शहरातील बी. डी. भालेकर केंद्र, मखमलाबाद येथील छत्रपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गडकरी चौकातिल रमाबाई आंबेडकर कन्या विद्यालय तसेच ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर शिक्षक मतदार सकाळी पावने सातपासून रांगेत उभे होते. मतदान केंद्रावर शिक्षक मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदान केंद्रावर मोबाईल घेऊन जाण्यास परवानगी नसल्याने शिक्षकांची तारांबळ उडाली. मतदान केंद्रावर उमेदवार व त्यांचे कार्यकर्ते भेट देऊन शिक्षक मतदारांना आवाहन करत होते. विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण गेडाम यांनी मतदान केंद्रात भेट देत पाहणी केली.

मतदान केंद्रावर भेट देत पाहणी करतांना विभागीय आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी प्रविण गेडाम.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT