नाशिक

Nashik ZP | तीन अधिकारी येऊन गेले तरी कर्मचाऱ्याचे पुनर्नियुक्तीवर विनाआदेश काम सुरुच

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ग्रामपंचायत विभागामध्ये पुनर्नियुक्तीवर कार्यरत असलेले ग्रामसेवक संजय बाविस्कर यांना मुळ पदस्थापनेवर पाठवल्यानंतर अनेक विषयांना सुरुवात झाली आहे. मुळात जिल्हा परिषद मुख्यालयात ग्रामसेवक हे पदच अस्तित्वात नसताना गेल्या आठ वर्षांपासून ते कार्यरत कसे होते ? ते कार्यरत असताना विभागप्रमुख म्हणून असलेल्यांना काही माहित नव्हते का ? त्यांची मुळ आस्थापना कुठे ? त्यांचा पगार कुठून निघत होता, अशी अनेक प्रश्न निर्माण झाली आहेत.

याबाबत बोलताना मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी संबंधित बाविस्कर हे येथे पुनर्नियुक्तीवर काम करत असल्याचे माहितीच नव्हते. ग्रामपंचायतीं तसेच ग्रामसेवकांच्या सुनावतीत देखील त्यांचा सहभाग होता. जर या ठिकाणी पदच अस्तित्वात नाही तर असे कसे होऊ शकते. सध्याच्या तसेच यापुर्वीच्या अधिकाऱ्यांशी याबाबत बोलणे आवश्यक असल्याचे मित्तल यांनी स्पष्ट केले.

जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात गेल्या आठ वर्षांपासून पुनर्नियुक्तीवर विनाआदेश काम करत असताना या कार्यकाळात तब्बल तीन अधिकारी येऊन गेले तरी, प्रशासन याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामसेवक संघटनांच्या तक्रारीनंतर प्रशासन जागे

गेल्या आठवड्यात ग्रामसेवक संघटनांनी सीईओ मित्तल यांची भेट घेतली होती. या भेटीत बावीस्कर यांच्या कामकाजाबाबत गंभीर तक्रारी केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मित्तल यांनी बाविस्कर यांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ग्रामपंचायत विभागाचे प्रभारी उपमुख्यकार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी बाविस्कर यांच्या कार्यमुक्तीचे आदेश काढत मुळ पदस्थापना असलेल्या चांदवड पंचायत समितीत हजर राहण्याचे आदेश दिले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT