नाशिक

Nashik ZP : जिल्हा परिषदेच्या 1,038 जागांसाठी 64,080 अर्ज दाखल

गणेश सोनवणे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली त्यानुषंगाने जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया ही आजपासून राबविण्यात येणार आहे. यामध्ये 20 संवर्गातील तब्बल १०३८ पदांची भरतीप्रक्रिया पार पडणार असून, यासंदर्भातील जाहिरात ५ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 1038 जागांसाठी तब्बल 64080 उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली. Nashik ZP

परीक्षेची संपूर्ण भरतीप्रक्रिया शासनाने मान्यता दिलेल्या आय.बी.पी.एस. या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. त्यामुळे ही परीक्षा अत्यंत पारदर्शक व काटेकोर पद्धतीने होणार आहे. तथापि, काही समाज विघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून प्रलोभन दाखवून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा फसवणुकीपासून उमेदवारांनी दक्षता घ्यावी तसेच अशा प्रकारच्या कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, अन्यथा अशी फसवणूक झाल्यास शासन अथवा जिल्हा परिषद जबाबदार राहणार नाही. अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती परीक्षेसंदर्भात आर्थिक मागणी करीत असल्याचे निदर्शनास आल्यास त्यांच्याविरुद्ध जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. 

कुठल्या पदासाठी किती अर्ज –

पद- जागा-एकूण अर्ज

(कंत्राटी) ग्रामसेवक – 50 – 11728

आरोग्य पर्यवेक्षक – 3 – 91

आरोग्य परिचारिका [आरोग्यसेवक (महिला)] – 597 – 3954

आरोग्यसेवक (पुरुष) 40% – 85 – 17579

आरोग्यसेवक (पुरुष) 50%– 126 – 6488

औषधनिर्माण अधिकारी – 20 – 5057

प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 14 – 2607

विस्तार अधिकारी (सांख्यिकी) – 2 – 337

विस्तार अधिकारी (शिक्षण) (वर्ग ३ श्रेणी २) – 7 – 1047

वरिष्ठ सहायक – 3 – 1773

पशुधन पर्यवेक्षक – 28 – 774

कनिष्ठ आरेखक – 2 – 41

कनिष्ठ लेखा अधिकारी – 1 – 48

कनिष्ठ सहायक (लेखा) – 5 – 863

/ कनिष्ठ सहायक (लिपीक) – 22 – 2667

मुख्य सेविका / पर्यवेक्षिका – 4 – 677

कनिष्ठ यांत्रिकी – 1 – 44

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) इवद/ग्रा.पा पु. – 34 – 5268

स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (स्थापत्य ) इवद/ग्रा.पा पु. – 33 – 2942

लघुलेखक (उच्च श्रेणी) – 1 – 95

एकूण जागा = 1038 – 64080

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT