नाशिक

नाशिक : खामखेडा येथील गिरणा नदी पात्रात तरुण बुडाला, शोधकार्य सुरू

अंजली राऊत

खामखेडा, देवळा, (जि. नाशिक): पुढारी वृत्तसेवा – देवळा तालुक्यातील खामखेडा येथील गिरणा नदीत भऊर पुलाजवळ तरुण बुडाल्याची घटना शनिवारी सायं.४ च्या सुमारास घडली. ग्रामस्थांनी शोधकार्य सुरू केले. मात्र, अंधार झाल्याने मदतकार्य थांबविण्यात आले आहे.

गिरणा नदीला आवर्तन सोडण्यात आल्याने अनेक मेंढपाळ नदीकाठी मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी तसेच कपडे धुण्यासाठी येतात. शनिवारी काही मेंढपाळ मेंढ्यांना पाणी पाजण्यासाठी आले असता रवि सीताराम खताळ (30, रा. वाघापूर, ता. साक्री, जि. धुळे) हा काठावर आंघोळ करत असताना बनियन नदीत पडल्याने ते काढण्यासाठी पात्रात गेला असता, पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाला. जवळ उभे असलेल्या व्यक्तीच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी सरपंच वैभव पवार यांना फोन करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर गावातील पोहणाऱ्या तरुणांनी शोधकार्य सुरू केले. मात्र, सायंकाळपर्यंत शोध लागू शकला नाही. तहसीलदार मिलिंद कुलकर्णी यांनी सिन्नर येथील स्कुबा ड्रायव्हिंग, सायखेडा, मालेगाव येथील पथकांशी संपर्क साधून पथके बोलावली असून, रविवारी पुन्हा शोधकार्य सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT