The Meteorological Department issued a yellow alert in Nashik district from September 13 to 15
नाशिक : तीन दिवसांपासून पावसाने उघडीप घेतल्यानंतर शनिवारपासून (दि.13) पुन्हा जिल्हयात पावसाची शक्यता आहे. जिल्ह्यात १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केला आहे.
कृषी क्षेत्रावरील प्रभाव आधारित अंदाज आणि इशा-यानुसार, या कालावधीत जिल्हयात तसेच घाट क्षेत्रात काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट, पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. शनिवारी (दि.13 ) आणि सोमवारी ( दि. 15) जिल्ह्यात आणि घाट क्षेत्रात एक-दोन ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि 30-40 किमी/तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता आहे. रविवारी (दि.14) जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट आणि वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज महात्मा फुले कृषी विद्यापीठ, इगतपुरी येथील विभागीय कृषी संशोधन केंद्राने वर्तविला आहे. या केंद्राने शेतक-यांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. शेतक-यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, पिकांचे संरक्षण करावे आणि विजेच्या कडकडाटापासून सुरक्षित राहण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात असे आवाहन विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.