fraud case (File Photo)
नाशिक

Nashik loan fraud :1 कोटी रुपयांचे कर्ज व परताव्याचे आमिष, सिडकोत महिलेची २२ लाखांची फसवणूक

नाशिक:1 कोटी रुपयांचे कर्ज व परताव्याचे आमिष, सिडकोत महिलेची २२ लाखांची फसवणूक

पुढारी वृत्तसेवा

सिडको : पुढारी वृत्तसेवा

फायनान्स कंपनीच्या माध्यमातून 1 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेवर आठ ते दहा टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले. दोन ते तीन तरुणांनी एका महिलेची तब्बल २२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणांनी फायनान्स कंपनीमार्फत १ कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून देण्याचे आश्वासन फिर्यादी महिलेला दिले. तसेच गुंतवणूक केलेल्या रकमेवर आठ ते दहा टक्के परतावा मिळेल, असे सांगून तिचा विश्वास संपादन केला. कर्ज मंजुरीच्या प्रक्रियेसाठी वेळोवेळी बँक खात्यात पैसे जमा करण्यास तसेच रोख रक्कम देण्यास सांगण्यात आले.

कर्ज मंजूर होईल आणि गुंतवणुकीवर परतावा मिळेल, या अपेक्षेने संबंधित महिलेने वेळोवेळी पैसे दिले. मात्र, या व्यवहारात तिची एकूण २२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT