नाशिक : वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्राची पाहणी करताना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद. समवेत उपवनसंरक्षक राकेश सेपट, सिद्धेश सावर्डेकर, रेस्क्यूचे सदस्य. Pudhari News Network
नाशिक

Nashik Wildlife Treatment Center : वन्यजीव उपचार केंद्रास नाशिक जिल्हाधिकाऱ्यांची भेट

म्हसरुळमधील केंद्रातील सुविधांची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक शहरासह जिल्ह्यात बिबट्यांचे दिसण्याच्या घटना वाढत असल्याने वनविभागाला सतत उपाययोजना राबवाव्या लागत आहेत. पकडलेले बिबटे, अनाथ बछडे तसेच अपघातात जखमी झालेले वन्य प्राण्यांवर उपचार करण्यासाठी म्हसरुळ येथे कार्यान्वित असलेल्या वन्यजीव उपचार केंद्रास जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी भेट देत पाहणी केली.

या उपचार केंद्रात सध्या १४ बिबटे, कोल्हा, लांडगा, तरस या वन्य प्राण्यांवर देखभाल व उपचार सुरू आहेत. शहर आणि जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणाहून पिंजऱ्यात पकडलेल्या बिबट्यांनाही येथे आणले जाते. वन्य प्राण्यांच्या उपचार आणि संवर्धनासाठी 'रेस्क्यू चॅरिटेबल ट्रस्ट' या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून औषधोपचार, देखभाल आणि आहाराची व्यवस्था केली जाते. यासाठी वनविभाग आणि संस्थेत सामंजस्य करार करण्यात आला आहे. केंद्रात अतिदक्षता विभाग, शल्यचिकित्सा सुविधा, २४ तास कर्मचारी, दोन पशुवैद्यकीय अधिकारी प्राण्यांच्या आरोग्याची सतत काळजी घेतात. उपचार केंद्राच्या विस्तारासाठी आणि आवश्यक सोयी सुविधांसाठी प्रशासनाकडून सहकार्य केले जाईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

बिबट्यांचे नामकरण

समृद्धी महामार्गालगत जखमी अवस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीचे 'समृद्धी' असे नामकरण करण्यात आले आहे. आईपासून दुरावलेल्या मादी बछड्याचे 'परी' असे नामकरण करण्यात आले आहे.

-काेट

बिबट्याचे अनाथ बछडे, जखमी बिबट्यांसह वन्य प्राण्यांवर येथे उपचार केले जातात. केंद्राच्या विस्तारासाठी प्रशासनाकडून निश्चितच सहकार्य केले जाईल.

-आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, नाशिक

-

नाशिकमध्ये सुरू असलेल्या वन्यजीव उपचार केंद्रात 'रेस्क्यू' संस्थेच्या मदतीने वन्यजीवांवर आवश्यक ते उपचार केले जातात.

-सिद्धेश सावर्डेकर, उपवनसंरक्षक, नाशिक

फोटो

(फोटोसिटी वन मध्ये जिल्हाधिकारी आणि बिबिटे व जिल्हाधिकारी असे २ फोटो सेव केले आहे)

--

--

---

--

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT