नाशिक : पश्चिम विधानसभा मतदारसंघातील प्रचार रॅलीत मतदारांना अभिवादन करताना सुधाकर बडगुजर.  
नाशिक

नाशिक पश्चिम मतदारसंघ झाला बडगुजरमय

Maharashtra Assembly Polls | विक्रमी मतांनी निवडून येतील : डी. जी. सूर्यवंशी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचाराच्या तोफा धडाडत आहेत. महाविकास आघाडीची निष्ठावंत कार्यकर्त्यांची असलेली फौज आणि सर्व एकदिलाने कार्य करीत असल्याने बडगुजर हे विक्रमी मतांनी विजयी होतील, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे कोअर कमिटी सदस्य डी. जी. सूर्यवंशी यांनी केला आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी (दि. १५) हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर जाहीर सभा होत आहे. या सभेचे जोरदार नियोजन सुरू आहे. ही सभा विक्रमी गर्दीची ठरेल, असा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. ठाकरेंच्या या दौऱ्यात विविध पक्षांतील बड्या नेत्यांच्या पक्षप्रवेशही होणार असल्याने या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. बडगुजर यांच्यासह नाशिक महानगरातील महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून आणून इतिहास घडवण्याचा निर्धार पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी उपेंद्रनगर, वैष्णवी देवी मंदिर, साईग्राम, माणिकनगर, प्रसन्ननगर, अथर्व मेडिकल, गजानन महाराज मंदिर, जैन कॉलनी ओम कॉलनी, बुरकुले हॉल, गणेश कॉलनी, शुभम पार्क, रामेश्वरनगर, संजीवनी हॉस्पिटल, निखिल पार्क, विठ्ठलनगर, सिद्धटेकनगर, अंबिकानगर, डीजीपीनगर, विशाल पार्क, वावरेनगर, वृंदावननगर, नाना पवार कॉलनी, कमलनगर, अभियंतानगर, यशराज पार्क जिजामाता कॉलनी, पुरुषोत्तम पार्क, स्वामीनगर, रजत पार्क परिसरातील प्रत्येक भाग पिंजून काढला.

प्रचार दौऱ्यात किरण गामणे, नाना महाले, तानाजी जायभावे, पुंजाराम गामणे, दत्ता तडाखे, धोंडिराम आव्हाड, सुनील ढाकणे, सुनील घुगे, कृष्णा काळे, द्वारका गोसावी, दीपक गामणे, विक्रांत सांगळे, नितीन घुगे, दीपाली बागूल, सचिन घुगे, तन्मय शिंदे, तेजस भागवत, ऋतिक नवले, आनंद घुगे, रोहिदास गवळी, दीपक दातीर, सुनील पाटील, वंदना पाटील आदी सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT