कळवण (नाशिक) : नगरपंचायत हद्दीतील ओतूर रोड जलकुंभ व वाचनालय परिसरातातील जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा चार दिवस बंद राहणार असल्याची माहिती कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी दिली.
चार दिवस पाणी बंद
शहरात ओतूरकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे रस्त्यातून जाणारी पाइपलाइन लीकेज दुरुस्ती व बदलण्याचे काम सुरू असल्याने ओतूर रोड जलकुंभ व वाचनालय जलकुंभातून होणारा पाणीपुरवठा शिवाजीनगर, बस स्टॅण्ड ते ओतूर रोड, फुलामाता चौक, गांधी चौक, सुभाष पेठ, शाहीर लेन, मेन रोड, तलाठी कॉलनी या भागातील पाणीपुरवठा दि. २८ नोव्हेंबर ते २ डिसेंबर दरम्यान चार दिवस बंद राहणार आहे.
ही पाइपलाइन लीकेज दुरुस्ती व बदलण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. नागरिकांनी या तांत्रिक अडचणी विचारात घेऊन उशिरा होणाऱ्या पाणीपुरवठ्याबद्दल कळवण नगरपंचायतीला सहकार्य करावे. पाणी जपून वापरावे, असे आवाहन कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी नागेश येवले यांनी केले आहे.