Water crisis 
नाशिक

Nashik Villages Water crisis| पिंपळगाव खांबसह सात गावांत पाणीबाणी

नागरिकांची पाण्यासाठी वणवण : पाणीपुरवठा अधिकारी, कर्मचाऱ्यांचे कानावर हात

पुढारी वृत्तसेवा

नाशिक :धरणात्त मुबलक पाणी असतानाही नाशिकरोड विभागातील पिंपळनाव रखांब, बडनेर गेट, जाधववाडी, चिंचवाडी, एकतानगर, पाथर्डी या गावांमध्ये गेल्या महिनाभरापासून पाणीबाणी असल्याचे चित्र आहे. महापालिकेच्या पाणीपुरयता विभागातील अधिकारी, कर्मचायांकडे वारंवार तक्रारी करूनदेखील पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

एकीकडे शहरात बेसुमार अन् बेभानपणे खोदकाम करताना, त्यात जलपाहिन्यांमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. तर दुसरीकडे पाण्याअभावी या सात गावांमधील नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून या गावांमध्ये सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याच्या गावक-यांच्या तक्रारी आहेत. या गावांमध्ये केवळ एक वेळाच वेळी-अवेळी पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय मागील महिनाभरापासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने, पिण्याचे पाणीदेखील मिळत नसल्याचे चित्र आहे.

नागरिकांकडून सातत्याने टैंकर मागविले जात आहेत, मात्र, आता टैंकर मिळविण्यातही अडचणी येत आहेत. या गावांना सिडको विभागातून पाणीपुरवठा होतो. त्यामुळे पाथर्डी गावापासून ते पिंपळगाव खांबपर्यंत गाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने, एप्रिल महिन्यातच पाण्यासाठी नागरिकांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे. दरम्यान, पाविषयी नागरिकांनी वारंवार पाणीपुरवठा अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. मात्र, अधिकाव्यांकडून कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. कर्मचारी, व्हॉल्वदामन यांना विचारणा केल्यास, तेदेखील तोंडावर बोट ठेवतात. याशिवाय या भागातील लोकप्रतिनिधींकडून देखील प्रतिसाद मिळत नाही, त्यामुळे आता ताकार करावी तरी कोणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

प्रभाग २२ आणि ३१ मध्ये या गावांचा समावेश होतो. मागील महिनाभरापेक्षा अधिक काळापासून या गायांमध्ये पाणीबाणी आहे. अधिकारी, कर्मचारी थातूरमातूर उत्तरे देतात. नगरसेवक देखील लाक्ष देण्यास तयार नाहीत. टैंकर मिळविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा नागरिकांसह महापालिकेवर धडक मोर्चा काढू.

- जगदीश पवार, माजी नगरसेवक

गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने टैंकर मागवावे लागत आहेत. आता तर टैंकर मिळविण्यातही अडचणी येत आहेत. कोणीही लक्ष देण्यास तयार नाही. अधिकारी, कर्मचायांना पाणीपुरवता सुरळीत करण्याची मागणी केली. लोकप्रतिनिधीही ऐकत नाही. आता आम्हालाच सत्यावर उतरावे लागणार आहे.

- सुनील शिंदे, नागरिक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT