सिडको (नाशिक) : त्र्यंबकेश्वर रस्त्यावर बेझेफाटा येथे मंगळवारी (दि.22 ) रात्री साडे अकरा वाजता चारचाकीच्या झालेल्या अपघातात अंबड येथील दोन युवक ठार झाले आहेत या घटनेने अंबड गावावर शोककळा पसरली आहे.
अंबड गावातील पंकज दिलीप दातीर ( वय ३१) व अभिषेक ज्ञानेश्वर घुले ( ३०) अशी ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. त्यांची कार रस्त्यावरील दुभाजकाला धडकल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे. या दोन्ही युवकांवर बुधवारी (दि.23) रोजी सकाळी अंबड स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. युवकांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
मयत पंकज हा अंबड औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीत अधिकारी होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. मयत अभिषेक याच्या पश्चात आई, वडील ,बहीण, भाऊ असा परिवार आहे.