सांगली एसटी विभागाकडील 11 एकर जागा 25 वर्षे पडून Newsband Office
नाशिक

Kumbh Mela 2027 | सिंहस्थात धावणार साडेचार हजार बसेस

Kumbh Mela 2027 | नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सिंहस्थ कुंभमेळा २०२७ दरम्यान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येणाऱ्या कोट्यवधी भाविकांचा प्रवास सुरक्षित, नियोजनबद्ध आणि सुलभ व्हावा, यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून व्यापक सार्वजनिक वाहतूक आराखडा तयार केला आहे.

या अंतर्गत एकूण ४,५०० बसची व्यवस्था करण्यात येणार असून, दररोज ३३ लाखांहून अधिक भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता निर्माण केली जाणार आहे. या नियोजनानुसार रस्ते मागनि येणाऱ्या भाविकांसाठी बाह्य वाहनतळ ते नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमधील प्रमुख धार्मिक स्थळांपर्यंत तीन हजार बसची विशेष सेवा उपलब्ध असेल. तसेच रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठी रेल्वे स्थानकांपासून पुढील प्रवासासाठी स्वतंत्र १,५०० बसची व्यवस्था करण्यात येणार आहे.

कुंभमेळा प्राधिकरणाच्या वाहतूक आराखड्यात बाह्य वाहनतळ, अंतर्गत प्रवासी उत्तरविण्याची ठिकाणे आणि रामतीर्थ तसेच त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरातील पायी मार्ग व्यवस्था अशा तीन स्तरांवर नियोजन करण्यात आले आहे. अमृतस्नानासारख्या गर्दीच्या दिवसांमध्ये वाहतूक कोंडी टाळणे आणि भाविकांचा शेवटच्या टप्प्यातील प्रवास सुरळीत करणे, हा वा व्यवस्थेचा मुख्य उद्देश आहे.

रस्ते मागनि येणाऱ्या भाविकांसाठी ४६ बाड़ा वाहनतळांपासून विशेष बससेवा चालविण्यात येईल. यामध्ये नाशिकमधील चाह्य वाहनतळ ते अंतर्गत ठिकाणांसाठी ९०० वस, नाशिकमधील वाहनतळ ते त्र्यंबकेश्वर मार्गासाठी १,४८५ बस, तर त्र्यंबकेश्वरमधील अंतर्गत वाहतुकीसाठी ३२५ बस उपलब्ध असतील.

गर्दीच्या काळातील अतिरिक्त गरज लक्षात घेऊन २९० बस राखीव ठेवण्यात येणार आहेत. या व्यवस्थेद्वारे २४ तासांत सुमारे ४०७ फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले असून, दररोज सुमारे २५.३६ लाख भाविकांची वाहतूक करण्याची क्षमता उपलब्ध होणार आहे. रेल्वेने येणाऱ्या भाविकांसाठीही स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.

नाशिकरोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे सुकेणे या पाच रेल्वेस्थानकांना बससेवेशी जोडण्यात येणार आहे. यासाठी १ ५०० बसचे नियोजन करण्यात आले असून, त्यापैकी ५२० बस रेल्वेस्थानक ते अंतर्गत वाहनतळ आणि ६८० बस रेल्वेस्थानक ते त्र्यंबकेश्वर मार्गावर धावतील. तसेच ३०० बस राखीव ठेवण्यात येतील. या व्यवस्थेतून दररोज सुमारे ८.२६ लाख रेल्वे प्रवाशांची वाहतूक करता येणार आहे.

अमृतस्नानाच्या प्रमुख दिवसांमध्ये भाविकांची सर्वाधिक गर्दी अपेक्षित असल्याने खासगी वाहनांना निश्चित केलेल्या बाह्य वाहनतळांपर्यंतच प्रवेश दिला जाणार आहे. तेथून पुढे भाविकांना राज्य परिवहन महामंडळाच्या विशेष बसद्वारे धार्मिक परिसरापर्यंत पोहोचविण्यात येईल. संपूर्ण बस वाहतुकीवर उपग्रह आधारित यंत्रणेद्वारे देखरेख ठेवण्यात येणार असून, ही व्यवस्था एकात्मिक नियंत्रण कक्षाशी जोडण्यात येईल. त्यामुळे वसची उपलब्धता, फेण्यांचे नियोजन, प्रतीक्षा वेळ आणि गर्दीचे व्यवस्थापन प्रभावीपणे करता येणार आहे.

कुंभमेळ्यासाठी अनेक भाविक शेकडो किलोमीटरचा प्रवास करून नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे येतात. त्यांच्या प्रवासातील शेवटचे काही किलोमीटर सुरक्षित, सुलभ आणि नियोजनबद्ध व्हावेत, यावर आमचा भर आहे. मोठ्या प्रमाणावरील गर्दीचे प्रभावी व्यवस्थापन आणि भाविकांची सुविधा लक्षात घेऊन ही विशेष बस व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
- शेखर सिंह (आयुक्त कुंभमेळा प्राधिकरण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT