नाशिक रोड: भुसावळ विभागातील जळगाव–मनमाड दरम्यान तिसऱ्या मार्गाच्या जोडणीसाठी माहेजी येथे यार्ड रिमॉडेलिंगचे काम करण्यात येणार आहे.
त्यासाठी गुरूवारी (दि. १२) नॉन इंटरलॉकिंग कामासाठी इगतपुरी–भुसावळ मेमू आणि भुसावळ–इगतपुरी मेमू रद्द करण्यात आली आहे. तर वास्को-दी-गामा-पटना एक्सप्रेस सुमारे दीड तास, एलटीटी- हरिव्दार गाडी आणि एलटीटी–रक्सौल एक्स्प्रेस सुमारे ४५ मिनिटे नियंत्रित करण्यात येणार असल्याचे रेल्वेने कळविले आहे. मुंबई एलटीटी–गोरखपूर एक्स्प्रेस मुंबईहून सकाळी सहाऐवजी पावणे सातला सुटेल. एलटीटी–गोरखपूर एक्स्प्रेस एलटीटी येथून ०६.३५ ऐवजी ०७.३५ वाजता सुटणार आहे.