नाशिक

नाशिक : सिडकोत घरात गॅस सिलींडरच्या स्फोटात तिघे भाजले; एकाची प्रकृती चिंताजनक

backup backup

सिडको; पुढारी वृत्तसेवा : घरात पहाटे पाणी तापविण्यासाठी गॅसचे बटण सुरू करून लाईटर शोधुन काही वेळाने पेटविण्याचा प्रयत्न केला असता गॅस घरात पसरल्याने अचानक झालेला स्फोटात घरातील तिघेही गंभीर जखमी झाल्याचा प्रकार सिडकोतील उत्तम नगर परिसरात घडला आहे. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. घटने नंतर घरातील कपडे जळून खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. स्फोटा नंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती.

याबाबत अधिक माहिती अशी की, उत्तम नगर येथील सर्वेश्वर महादेव मंदिर चौकात सिडकोचे दोन मजली घर आहे. या घराचा तळमजल्यावर गेल्या दोन महिन्याभरापूर्वी तुषार पंडित जगताप हे आपल्या कुटुंबीयांसोबत राहत होते. ते अंबड येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करत होते गेल्या चार ते पाच दिवसांपासून त्यांच्या पत्नीला डेंगू झाल्याने ती रुग्णालयात उपचार घेत होते. दवाखान्यात त्याच्या पत्नी समवेत तिची आई व मुलगा होता. तर तुषार पंडित जगताप ( वय ३४) व त्यांची आई शोभा पंडित जगताप ( वय ५६ ) तसेच त्याचे सासरे बाळकृष्ण सुतार ( वय ६५ ) हे तिघेही घरात झोपलेले होते.

सकाळी सहा वाजताच्या सुमारास शोभा जगताप ह्या घरात किचनमध्ये गॅसवर पाणी तापवत असताना गॅसचा स्फोट झाला. संपूर्ण घरात आग लागली. काही वेळातच तुषार जगताप (वय ३४) हे गंभीर भाजले गेले होते. तर आई शोभा जगताप व सासरे सुतार हे देखील भाजले. या आगीमुळे पंधरा ते वीस फूट अंतरावर असलेल्या चार चाकीच्या काचाही फुटल्या. तसेच घरातील कपडे जळाले होते तसेच तुषार जगताप हे भाजल्याने हे बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते.

बाजूच्या नागरिकांना स्फोटचा आवाज आल्याने त्यांनी जगताप यांच्या घराकडे धाव घेतली. तात्काळ स्थानिक रहिवाशांनी त्यांना एका खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. लगेचच अंबड पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली असता मोबाईल चार्जिंगला लावला तसेच घरात कॉस्मेटिकचे सामान बॉडी स्प्रे, सिलेंडर मधून गॅस गळती झाल्यामुळे स्फोट झाले असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता . याबाबत पोलिसांनी सायंकाळी जखमी शोभा जगताप यांचा जबाब घेतला. असता गॅसचे बटन सुरू राहिले होते अचानक गॅस पेटवायला गेले, असता भडका झाल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात आकस्मित जळीत प्रकरणाची नोंद करण्यात आली आहे. तुषार जगताप हे गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक प्रमिला कावळे करीत आहेत .

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT