सिडको : पाण्याचा अंदाज न आल्याने विल्होळी गावा-लगत असलेल्या डॅममध्ये पाथर्डी फाटा येथील युवक बुडाला. रात्री उशिरापर्यंत शोध घेण्याचे काम सुरू होते. राहुल भिकन भोसले (22, रा. अंजली लॉन्सजवळ, पाथर्डी फाटा) असे बुडालेल्या युवकाचे नाव आहे.
राहुल हा मित्र यश काळे समवेत मंगळवारी (दि.11) दुपारी 3 वाजता डॅमवर दुचाकी धुवत असताना पोहण्यासाठी उतरला. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला. नंतर यश याने डॅमवर राहणारे पोलिसपाटील संजय चव्हाण यांना माहिती दिली. पोलिसपाटील चव्हाण यांनी पोलिसांना माहिती दिली या नंतर पोलिस निरीक्षक सत्यजित आमलेसह पोलिस कर्मचारी व अग्निशामक दलाचे कर्मचारी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेणे सुरू होते. राहुल इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करत होता.