खुंटेवाडी येथे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वाटप करताना माजी सरपंच व देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार, ग्रामस्थ व शिक्षक. (छाया – सोमनाथ जगताप)
नाशिक

नाशिक : खुंटेवाडीतील शाळेच्या नववर्षाला टाळ-मृदुंगाच्या गजरात स्वागत

विद्यार्थ्यांना गणवेश व पुस्तकांचे वाटप

पुढारी वृत्तसेवा

देवळा (नाशिक) : आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या लाखो वारकऱ्यांना प्रेरणा मिळावी, या आध्यात्मिक उद्देशाने तालुक्यातील खुंटेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या नववर्षारंभ दिनी टाळ-मृदुंगाच्या गजरात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

सोमवारी (दि. १६) जिल्हाभरात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात विविध उपक्रमांनी झाली. त्याच अनुषंगाने, खुंटेवाडीत माजी सरपंच व देवळा बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब पगार यांच्या संकल्पनेतून वारीच्या प्रेरणेने गावातून दिंडी काढून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचे वाटपही करण्यात आले.

वारीच्या प्रेरणेने गावातून दिंडी काढण्यात आली

या उपक्रमाला सरपंच ठगुबाई पवार, उपसरपंच संजय भामरे, तंटामुक्ती अध्यक्ष सावळीराम भामरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगेश भामरे यांच्यासह कैलास भामरे, सुरेश पगार, भिका भामरे, पांडुरंग भामरे, प्रभाकर रौदळ, सेवानिवृत्त शिक्षक थोरात, पोलीस पाटील कल्पना भामरे, मुख्याध्यापिका रत्नमाला गांगुर्डे, अर्चना काकडे, सौ. देवरे मॅडम, अंगणवाडी सेविका कल्पना भामरे, सुनंदा थोरात, गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT