नाशिक

नाशिक: चिराई घाटात टेम्पोसह ६ लाखांचा किराणा माल जळून खाक

अविनाश सुतार

सुरगाणा, पुढारी वृत्तसेवा : सुरगाणा तालुक्यातील चिराई घाटात बोरगावकडून सुरगाणाकडे जाणा-या (एमएच ४१ एयु ४४६५) टेम्पोला अचानक आग लागली. या आगीत टेम्पोसह साडेसहा लाखांचा किराणा माल जळून खाक झाला. ही घटना आज (दि. १३) सकाळी साडेआठ वाजता चिराई घाटात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, आज सकाळी टेम्पो बोरगावकडून सुरगाणाकडे किराणा माल घेऊन जात होता. यावेळी चिराई घाटात अचानक जळल्या सारखा वास आला असता वाहन चालक व मालक नंदलाल चौधरी (२५, रा. दळवट, ता. कळवण) याने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला. इतक्यात टेम्पोने पेट घेतला. यावेळी तेथे उपस्थित असलेले गौतम चौधरी, रविंद्र चौधरी (रा. दळवट, ता.कळवण) यांनी सुरगाणा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी सचिनकुमार पटेल यांनी माहिती दिली.

तत्काळ अग्निशमन दलाच्या गाडीने आग आटोक्यात आणली. तोपर्यंत वाहनात असलेला साडेसहा लाखांचा किराणा माल जळून खाक झाला होता. तसेच वाहनांची किंमत अंदाजे १८ लाख रुपये असून वाहनसुध्दा जळून खाक झाले आहे. यावेळी अग्निशमन दलाचे चालक मनोज पवार, ऑपरेटर सोमनाथ बागुल, फायरमन विजय गोयल यांनी एक तासात आग आटोक्यात आणली. घटनास्थळी सुरगाणा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील आहेर, पोलीस नाईक शिवराम गायकवाड, पोलीस शिपाई किरण पवार उपस्थित होते.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT