पंचवटी (नाशिक) : झाडांचं काय घेऊन बसला तर राव असे म्हणत, माणसांना कापू शकतात, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव' अशा धारधार कवितांचे वाचन करत तपोवनातील वृक्षतोडी विरोधातील आंदोलनाला कवी आणि कवियत्रींनी शब्दांचे बळ दिले.
तपोवनात दिवसभर कवितांचे वाचन व विविध गीतांचे गायन रंगले. शाहीर संभाजी भगत यांनी देखील विविध गीतांचे गायन केले. संघर्षाचे प्रतीक असलेले कवी नामदेव ढसाळ यांच्या कवितांचे वाचन करीत तपोवनात सुरू असलेल्या वृक्षतोडीविरोधातील आंदोलनास पाठिंबा दिला.
शाहीर संभाजी भगत यांनी गीतातून विचारधारेचा खून झाला की तत्वज्ञानाचे संकट उभे राहते, विचारधारा मेली की माणूस मरतो, असे सांगितले. कवी नामदेव ढसाळ यांच्या प्रतिभेचा आविष्कार तपोवनात पुन्हा अवतरला. राज्यसंस्था आणि धर्मसंस्था एकत्र आल्यानंतर जो कापण्याचा घाट आणि कट केला जातोय घाट घातला जातो आणि कट केला जातोय त्याच्या विरोधात लढायला कवी मंगळवारी (दि.9) तपोवनात आले होते.
झाडे लावा दारी । दुर होई दरी ।। समाधान घरी । तुमच्या हो ।। तोडू नका वृक्ष । होई सृष्टी रुक्ष ।। तुम्ही व्हाल भक्ष । जीवनात ।। वृक्षावर प्रेम । आसू द्याव बरं ।। तेच आहे खरं । जगामध्ये ।।
आरे कॉलनीतील झाडे एका रात्रीत लोकांना न कळवता अचानक कापली गेली. झाडांचे काय घेऊन बसला तर राव असे म्हणत, माणसांना कापू शकतात, तर झाडांचं काय घेऊन बसलात राव' ही कविता कवयित्री नीरजा यांनी वाचली.
कवयित्री प्रज्ञा पवार यांनी हा प्रश्न महाराष्ट्राच्या, भारताच्या संविधान वाचविण्याच्या चळवळीचा भाग आहे. 'बेंबीचा ओठ ओला होण्याच्या वयात' अविष्कारचे कार्यकर्ते दीपक राजाध्यक्ष यांनी कवी नामदेव ढसाळ यांची 'पेपरवेट' ही वेदना व संवेदना नसल्याच्या विषयीची कविता सादर केली. अंधाराने सूर्य पाहिला, तेव्हा शब्द हुंकारले, असे सांगितले.