Nashik Kumbh AI Stack 
नाशिक

Nashik Kumbh AI Stack|'कुंभ एआय स्टॅक' माध्यमातून होणार १२ कोटी भाविकांचे नियंत्रण

जागतिक कंपन्या आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मुंबईत कार्यशाळा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाने कुंभ एआय स्टैंक ही संकल्पना माडली असून, हजारी सीसीटीव्ही कॅमेरे, ड्रोन, सेन्सर्स आणि मोबाइल नेटवर्कमधील माहितीचे विश्लेषण करून तात्काळ निर्णय घेण्याची क्षमता या प्रणालीत असेल. त्यामुळे गर्दी वाढण्यापूर्वीच तिचा अंदाज घेऊन उपाययोजना करणे शक्य होणार आहे.

नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणारा सिंहस्थ कुंभमेळा सुरक्षित, सुरळीत आणि तंत्रज्ञानाधिष्ठित करण्यासाठी नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेला प्राधिकरणाने कृत्रिम बुद्धिमतेचा (एआय) व्यापक वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या अनुषंगाने मुंबईत नुकतीच उच्चस्तरीय कार्यशाळा पार पडली. बात बरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलिस यंत्रणेचे अधिकारी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील तंत्रज्ञान कंपन्यांचे प्रतिनिधी आले होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तंत्रज्ञानाला प्रशासनाचा कणा मानत कुंभमेळा अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याचा दृष्टिकोन मांडला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही उच्वस्तरीय चर्चा सुरू असून, कुंभ २०२७ हा देशातील सर्वात तंत्रज्ञानसक्षम कुंभमेळा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. कार्यशाळेस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार कौस्तुभध्वसे, नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, आयजी राजेश प्रधान, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, डीआयजी (वायरलेस) जी. श्रीधर, एसपी (वायरलेस) राजा रामास्वामी, नाशिक मनपाचे अतिरिक्त आयुक्त अमित रंजन, महा-आयटी सीईओ संजय काटकर, नाशिक त्र्यंचकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त कमलाकर रणादिवे उपस्थित होते.

मेटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, एमआयटी मीडिया लॅब, भाषिनी, सोकेट, एआय यांसारख्या आघाडीच्या तंत्रज्ञान कंपन्या आणि संस्थांचे तन्जही चचेत सहभागी झाले. कुंभमेळ्यातील गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक नियंत्रण, आरोग्यसेवा आणि आपत्कालीन प्रतिसादासाठी एआयचा नेमका कसा उपयोग होऊ शकतो, यावर चर्चा झाली. शहरात सध्या सुमारे १,३०० सीसीटीव्ही कार्यरत असून, त्यात ४,००० कॅमेऱ्यांची भर पडणार आहे. याबरोबरच स्मार्ट ट्रैफिक सिस्टीम, पार्किंग व्यवस्था आणि पर्यावरणीय सेन्मार्ग यांसारख्या पायाभूत सुविधा आधीच उपलब्ध आहेत. कुंभमेळ्यासाठी या सर्व संत्रणांचे एकत्रीकरण करण्यात येणार आहे.

भाविकांसाठी कुंभदूत हा एआय आधारित डिजिटल सहायक विकसित करण्यात येत आहे. सध्या तो मोबाइल फोनपासून स्मार्टफोनपर्यंत सर्वासाठी तो उपलब्ध असेल. व्हॉट्सअॅप, आयव्हीआर, मोबाइल अॅप आणि सार्वजनिक घोषणांद्वारे भाविकांना मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी कुंभमेळ्याचे व्यवस्थापन प्रतिक्रिया आधारित न राहता भविष्यवेधी करण्यावर भर देण्यात येत आहे. संभाव्य गर्दी, स्वच्छता आणि आरोग्याशी संबंधित अडचणी आधीच ओळखून उपाययोजना करण्याची क्षमता एआय प्रणालीत असेल. कुंभएआय सॅन्डबॉक्सच्या माध्यमातून विविध तंत्रज्ञान उपायांची चाचणी प्रत्यक्ष मेळ्यापूर्वी घेण्यात येणार आहे.

२०२७ मधील सिंहस्थ कुंभमेळयात सुमारे १२ कोटी भाविक सहभागी होण्याची अपेक्षा असून, एका दिवशी २.५ कोटी भाविकांची उपस्थिती राहू शकते, नाशिक आणि त्र्यंबकेश्वर ही प्रमुख स्थले ३२ किलोमीटर अंतरावर असून, दि. १५ जून ते ३० सप्टेंबर २०२० या कालावधीत हा मेळा पार पडणार आहे

असे होईल अॅपद्वारे नियंत्रण

  • सुमारे १२ कोटी भाविकांच्या हजेरीचा अंदाज

  • प्रतिदिन अडीच कोटी भाविकांची हजेरी

  • कुंभ एआय सैन्डवॉक्स विविध तंत्रज्ञान माहिती

  • कुंभदूत भाविकांना मोबाइलद्वारे मार्गदर्शक

  • शहरात ५,३०० सीसीटीव्हीद्वारे नियंत्रण

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT