परभणीतील एका गंभीर खून प्रकरणाचा उलगडा करण्यात यश 
नाशिक

Nashik Crime | सातपूरमधील मारहाण प्रकरणाचा तपास वेगात; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Nashik Crime | सातपूर पोलिस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या पथकाने अटक केली.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सातपूर पोलिस ठाणे हद्दीत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ च्या पथकाने अटक केली. हृषिकेश भगवान खराटे (४०, रा. एम.एच.बी. कॉलनी, सातपूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दि. २ नोव्हेंबर रोजी रात्री ११.४० च्या सुमारास सातपूर कॉलनी परिसरातील खासगी रुग्णालयासमोर उभे होते. त्यावेळी हृषिकेश खराटेने जुन्या भांडणाची कुरापत काढून लोखंडी हातोड्याने मारहाण करीत गंभीर जखमी केले होते.

याप्रकरणी सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित फरार झाला होता. दरम्यान, गुन्हे शाखा युनिट २ चे अधिकारी शोध घेत असताना हृषिकेश खराटे हा सातपूरगाव कमानीजवळ असल्याची माहिती पोलिस उपनिरीक्षक संजय सानप व पोलिस अंमलदार महेश खांडबहाले यांना मिळाली होती.

त्यानुसार पथकाने सातपूर गाव कमानीजवळ सापळा रचून हृषिकेश खराटेला ताब्यात घेतले. त्याने चौकशीदरम्यान गुन्हा केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील तपासासाठी त्याला सातपूर पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोलिस उपनिरीक्षक संजय सानप, यशवंत बेंडकोळी, हवालदार चंद्रकांत गवळी, पोलिस अंमलदार प्रदीप नन्नवरे, प्रवीण वानखेडे, महेश खांडबहाले आणि तेजस मते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT