नाशिक : शहरातील सातपूर परिसरातील महादेवनगरात वृक्षताेडीदरम्यान पेट्राेलचा भडका उडून भीषण स्फोट झाल्याने ६ ते ७ नागरिक भाजल्याची घटना घडली आहे. यात एका लहान बालकाचा देखील समावेश आहे.
नाशिक महापालिका प्रशासनातर्फे सातपूर येथील महादेवनगर परिसरात वृक्षतोडीचे काम सुरु होते. यावेळी एक इसम लिंबाच्या झाडाखाली विडी ओढत असताना पेट्रोल उडाल्याने भडका उडाला. यात एका बालकासह 7 जण भाजले. जखमींना तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.