नाशिक : प्रा. संदीप घायाळ संचलित संदीप सायन्स इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी बारावी तसेच जेईई मेन्सच्या निकालात परंपरा कायम राखत घवघवीत यश साधले आहे.
इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी प्रणव तुसे (90.50) गुण मिळवत संस्थेमध्ये तसेच इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज, ओढा येथे प्रथम क्रमांक पटकावला. प्रणवने जेईई मेन्समध्ये (88.55) पर्सेंटाईल मिळवत जेईई अॅडव्हान्ससाठी पात्रता मिळवली आहे. दुसऱ्या क्रमांकावर सानिका कोरडे (87.83) गुणांसह स्थान पटकावले असून, तिने जेईई मेन्समध्ये (89.15) पर्सेंटाईल मिळवत अॅडव्हान्स पात्रता प्राप्त केली आहे. जान्हवी पाटील (87) गुण मिळवत तिसरा, तर श्रावणी संधानने (84) गुणांसह चौथा क्रमांक मिळवला असून, ती केटीएचएम महाविद्यालयामध्ये पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचा इन्स्टिट्यूटतर्फे गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदीप घायाळ, प्रा. निकिता घायाळ, प्रा. सागर दरेकर, प्रा. नितीन जाधव, प्रा. किरण गोरे, प्रा. प्रणिता कोलते, प्रा. नेहा पाटील, प्रा. किरण पैठणे, प्रा. सुप्रिया बोडके, प्रा. सारिका बजाज, प्रा. ओमकार बरबडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. प्रा. मोनाली गवळी आणि शारदा पवार यांनी सूत्रसंचालन केले.