नाशिक : मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत प्रादेशिक परिवहन कार्यालयाने जप्त केलेल्या वाहनांचा जाहीर ई- लिलाव 25 जून रोजी रोजी सकाळी 10 वाजता ठेवण्यात आला आहे. लिलावात भाग घेऊ इच्छिणार्यांनी प्रादेशिक परिवहन विभागाच्या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
जप्त करण्यात आलेली वाहने 1) प्रादेशिक परिवहन कार्यालय, नाशिक, 2) बस डेपो, सिन्नर 3) एसटी वर्कशॉप, पेठ रोड, नाशिक येथील आवारात पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. कार्यालयातील वायुवेग पथकाने वेळोवेळी विविध गुन्ह्यांखाली अटकवून ठेवलेल्या वाहनांच्या वाहनमालकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावर पोहोच देय डाकेने नोटीस पाठविण्यात आलेली आहे. वाहनमालकांनी पत्त्यातील बदल नोंदणी प्राधिकाऱ्यास कळविणे बंधनकारक असतानाही या वाहनांच्या मालकांनी या कार्यालयास तसे कळविलेले नाही. त्यासाठी हे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात येत आहे. जाहीर ई- लिलावात एकुण 6 वाहने उपलब्ध आहेत. यात ऑटोरिक्षा, टॅक्सी, बसव मालवाहू वाहने या संवर्गांतील वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर व पर्यावरण कर भरण्याची संधी वाहनमालकांना राहील, याची नोंद संबंधित वाहनमालकांनी घ्यावी.
ई-लिलावात सहभागासाठी दि. 16 ते 20 जूनदरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 6 पर्यंत www.eauction.gov.in या संकेतस्थळावर तसेच नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयात 25 हजार रुपयांचा (प्रत्येक लॉटकरिता) अनामत धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) सह प्रत्यक्ष येऊन नाव नोंदणीची पूर्तता करावी लागणार आहे. ई- लिलावाच्या अटी व नियम कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालयात तसेच www.eauction.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहतील.