प्रादेशिक परिवहन कार्यालय Pudhari News network
नाशिक

Nashik RTO : आरटीओकडून दुचाकीसाठी आजपासून नवीन मालिका

नवीन सीरीजचा एम एच १५ जे झेड क्रमांकाने शुभारंभ

पुढारी वृत्तसेवा

पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी एम एच १५ जे झेड ही नवीन मालिका गुरुवार, दि. २४ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत असल्याची माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमंत हेमाडे यांनी दिली.

आकर्षक पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठीचे विहित नमुन्यातील अर्ज २४ ऑक्टोबर २०२४ ला सकाळी १०.३० ते २.३० दरम्यान कार्यालयाच्या आवक-जावक कक्ष क्रमांक विभागात जमा करणे अनिवार्य राहील. आकर्षक क्रमांकाचे अर्जासोबत केंद्रीय मोटार वाहन नियमानुसार विहित केलेल्या अर्जदाराच्या पत्त्याच्या पुराव्याची (आधारकार्ड, वीजबिल, घरपट्टी इ.) साक्षांकित केलेली छायांकित प्रत तसेच अर्जदाराचे फोटो ओळखपत्राची (उदा.आधारकार्ड/निवडणूक आयोगाचे ओळखपत्र/पासपोर्ट/पॅनकार्ड इ.) साक्षांकित छायांकित प्रत तसेच वाहन वितरकाकडे वाहन नोंदणीसाठी आधार लिंक मोबाइल क्रमांक सादर करणे आवश्यक आहे.

कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेचा अथवा शेडयुल्ड बँकेचा डिमांड ड्राफ्ट प्रादेशिक परिवहन अधिकारी, नाशिक (आरटीओ, नाशिक) यांचे नावे काढून पसंतीच्या नोंदणी क्रमांकाच्या शुल्काची रक्कम डिमांड ड्राफ्टद्वारे भरणे आवश्यक असून, अर्जासोबत पॅन कार्डची साक्षांकित प्रत जोडणे आवश्यक आहे. एकाच क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज आल्यास अशा आकर्षक क्रमांकांची यादी कार्यालयातील नोटीस बोर्डावर त्याच दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे.

असा करा अर्ज

ज्या अर्जदारांचा आकर्षक क्रमांक लिलाव प्रक्रियेसाठी समाविष्ट असेल अशा अर्जदारांनी लिलावात भाग घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी दुपारी ४ पर्यंत पसंतीच्या नोंदणी क्रमांकासाठी विहित केलेल्या शुल्काच्या रकमेच्या डिमांड ड्राफ्टव्यतिरिक्त कोणत्याही बोलीच्या रक्कमेचा एकच डिमांड ड्राफ्ट बंद लिफाफ्यात सादर करावा. ज्या अर्जदारांच्या बोलीच्या रक्कम जास्त असेल अशा अर्जदारासच पसंतीचा क्रमांक देण्यात येईल. लिलावामध्ये एकापेक्षा जास्त डिमांड ड्राफ्ट सादर करणाऱ्या अर्जदाराचा अर्ज रद्द करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT