नाशिक : येथील किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सेंटरचे उद्घाटन आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना मंत्री जाधव यांनी जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब असून, सेंटरचा लाभ संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील रुग्णांना होणार असल्याचे सांगितले.
रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट या सेंटरमुळे सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आता नव्या युगाकडे वाटचाल करीत आहे. शस्त्रक्रियेतील साहित्य, उपकरणे आणि तंत्रांमध्ये बर्याच सुधारणांमुळे या प्रक्रियेची परिणामकारकता अधिक वाढल्याचे त्यांनी सांगितले. तर संगणकाच्या सहाय्याने शस्त्रक्रियेचा हा नवीन टप्पा आहे. गुडघा बदलण्याच्या शस्त्रक्रियांसाठी जगातील पहिला स्वायत्त किम्स मानवता हॉस्पिटलमध्ये असेल. हा रुग्णांसाठी वरदान ठरणार असल्याचे हॉस्पिटलचे चेअरमन डॉ. राज नगरकर यांनी सांगितले. तर रोबोटिकच्या साह्याने गुडघा बदलण्याचे अनेक लाभ असल्याचे डॉ. स्पंदन कोशिरे यांनी सांगितले. सेंटरच्या उदघाटनप्रसंगी डॉ. मयूर पेखळे, डॉ. प्रणीत सोनवणे, डॉ. स्पंदन कोशिरे, सीओओ डॉ. नीलेश सिंग यांच्यासह रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.