नाशिक : महापारेषण कंपनीकडील एकलहरे औष्णिक विद्युत केंद्राच्या देखभाल व दुरूस्तीच्या कामांमुळे रविवारी (दि.१४) सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत विद्युत पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. यादरम्यान स्मार्ट सिटी कंपनीमार्फत नाशिकरोड येथील महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्राच्या आवारात फ्लो मीटर बसविण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे रविवारी (दि.१४) नाशिकरोड परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथील विद्युत पुरवठा खंडित राहणार असल्याने या कालावधीत नाशिकरोड जलशुध्दीकरण केंद्र येथून पाणी पुरवठा करणे शक्य होणार नाही. त्यामुळे या विभागातील प्रभाग क्रमांक १७ मधील चाडेगांव, एकलहरा रोड, सिन्नर फाटा, गोरेवाडी, चेहेडी गांव, चेहेडी पंपिंग रोड परिसर, सामनगांव रोड, ओढा रोड, प्रभाग क्रमांक १९ मधील कॅनॉल रोड, चंपानगरी परिसर, शिवराम नगर, दसकगांव, महालक्ष्मी नगर, बालाजी नगर, तिरूपती नगर, पारिजात नगर, गोसावी नगर आदी परिसर, प्रभाग क्रमांक १८ मधील मधील पवारवाडी परिसर, जुना सायखेडा रोड, भैरवनाथ नगर, जागृती नगर, आयोध्या नगर, पंचक गांव परिसर, प्रभाग क्रमांक २१ मधील आनंद नगर, जय भवानी रोड, रोकडोबावाडी, देवळालीगांव परिसर, प्रभाग क्रमांक २२ मधील देवळालीगांव गांवठाण परिसर, प्रभाग क्रमांक २० मधील लोकमान्य नगर, राम नगर, गंधर्व नगरी, आरंभ कॉलेज परिसर, जिजामाता नगर, कलानगर, ब्रह्मगिरी सोसायटी, भीमनगर व दत्त मंदिर परिसर आदी ठिकाणी रविवारी (दि.१४) सकाळी ६ ते सायंकाळी ७ वाजेपावेतो पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे कळविण्यात आले आहे.