arrested Pudhari File Photo
नाशिक

Nashik Road Gambling Raid | रेल्वेस्थानक परिसरात 13 जुगाऱ्यांना अटक

Nashik Road Gambling Raid | तीन लाख 41 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त; युनिट-१ कडून कारवाई

पुढारी वृत्तसेवा

नाशिक (पुढारी वृत्तसेवा):

नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरातील जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट क्रमांक १ च्या पथकाने छापा टाकून १३ जणांना अटक केली आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह एकूण तीन लाख ४१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणूक व महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तेरा नोव्हेंबर रोजी गुन्हे शाखा युनिट-१ चे हवालदार संदीप भांड आणि उत्तम पवार यांना नाशिकरोड रेल्वेस्थानक परिसरात सार्वजनिक ठिकाणी जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती.

या ठिकाणी संतोष गुदणे, भुय्या मामू उर्फ फिरोज, अशफाक शेख, शब्बीर आणि हुसेन हे साथीदारांच्या मदतीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी नागरिकांना दामदुप्पट पैशांचे आमिष दाखवत होते. त्यासाठी नागरिकांना 'काला पिला' नावाचा जुगार खेळण्यास प्रवृत्त करून हातचलखीने आर्थिक फसवणूक केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. अंचल मुदगल यांना माहिती दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक रमीज शेख यांच्या नेतृत्वाखाली विविध पथके तयार केली. पोलिसांनी वेशंतर करून रेल्वेस्थानक परिसर, बसस्थानक, हॉटेल तसेच घटनास्थळाच्या आजूबाजूला सापळा रचला.

प्रवाशांच्या वेषात असलेल्या पोलिसांनी जुगार अड्ड्यावर अचानक छापा टाकला. यावेळी १३ जणांना पकडले. या कारवाईत तीन लाख ४१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, तपास गुन्हे शाखा युनिट-१ करीत आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, रमीज शेख यांच्यासह गुन्हे शाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT