Road Digging  file photo
नाशिक

Nashik Road Digging Ban | रस्ते खोदकामास 15 ऑक्टोबरपर्यंत बंदी

नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पावसाळा जवळ आल्याने नागरिकांची गैरसोय आणि संभाव्य अपघात टाळण्यासाठी नाशिक महापालिकेने शहरातील सर्व प्रकारच्या रस्ते खोदाईच्या कामांना तत्काळ स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी संबंधित विभागांना आदेश जारी केले असून, १५ ऑक्टोबरपर्यंत कोणत्याही नवीन खोदकामास परवानगी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम, पाणीपुरवठा, मलनिस्सारण, विद्युत विभाग तसेच स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांसह भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल), महावितरण, विविध सेल्युलर कंपन्या आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड यांच्या ओएफसी, केबल व गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामांनाही या आदेशामुळे ब्रेक लागणार आहे.

ज्या ठिकाणी कामे पूर्ण करणे शक्य नाही, त्या ठिकाणी खोदकाम तत्काळ थांबवून रस्ते पूर्ववत दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खोदलेल्या रस्त्यांमुळे पावसाळ्यात खड्डे पडण्याची आणि वाहतूक व्यवस्था धोकादायक होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT