देवळाली कॅम्प: नाशिकरोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांचा उद्घाटन समारंभ आज (दि. 16) सायंकाळी ४.00 वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या हस्ते होणार आहे. नाशिक रोडचे न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश जे. एम. दळवी व नाशिक रोड बार असोसिएशन अध्यक्ष ॲड. सुदाम गायकवाड यांनी याबाबत माहिती दिली
स्वातंत्र्यानंतर नाशिकरोडला प्रथमच जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयांना उच्च न्यायालय व शासनाकडून मान्यता मिळाली. उद्घाटन समारंभास मुख्य अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार, न्यायमूर्ती सारंग कोतवाल, न्यायमूर्ती जितेंद्र जैन, न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन, न्यायमूर्ती संदीप मोरे, न्यायमूर्ती किशोर संत, न्यायमूर्ती मिलिंद साठे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीचंद जगमलानी राहणार आहेत. याशिवाय जिल्ह्यातील वरिष्ठ वकील उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाचे संयोजन नाशिक रोड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अॅड. प्रकाश गायकर, सचिव अॅड. सुनील शितोळे, सहसचिव अॅड. भिमाजी आरणे, खजिनदार अॅड. संग्राम पुंडे, जनसंपर्क सदस्य अॅड. अविनाश भोसले, ग्रंथपाल अॅड. दमयंती दोंदे, सदस्य अॅड. मनिषा बेदरकर, अॅड. महेश गायधनी, अॅड. प्रमोद कासार, अॅड. उमेश साठे आदींसह वकील संघाच्या सदस्यांनी केले आहे.