रिक्षाचालकांचे वाहतुक नियमाकडे दुर्लक्ष Pudhari News Network
नाशिक

Nashik Rickshaw Driver : बेशिस्त रिक्षासह वाहनचालकांना 68 लाखांचा दंड

नियमांचे उल्लघंन करणाऱ्याविरोधात नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : शहरात बेशिस्त रिक्षाचालकांसह इतर वाहनधाकांवर कारवाई करीत वाहतूक पोलिसांनी महिनाभरात 9 हजार 857 कारवायाच्या माध्यमातून ६८ लाख ८० हजार १५ रुपयांचा दंड वसुल केला आहे.

नाशिक शहरातील वाढती वाहतूक कोंडी सोडविण्यासह बेशिस्तपणे वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लघंन करणाऱ्याविरोधात पोलिस आयुक्तालयाच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात विशेष मोहिम राबविण्यात आली. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने आणि उपआयुक्त (वाहतूक) किरिथिका सी. एम. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईत रिक्षाचालकांवर बीएनएस २८५ तसेच मोटार वाहन अधिनियमाअंतर्गत १५६ गुन्हे व ३३४ एनसी गुन्हे दाखल करण्यात आले. एकूण ६७६ रिक्षांवर कारवाई ही करण्यात आली.

या वाहनांवर झाली कारवाई

  • ट्रिपल सीट : १,९१३

  • युनिफॉर्मशिवाय रिक्षा : १,५९६

  • राँग साइड वाहनचालक : १,५२९

  • रहदारीस अडथळा : १,०७३

  • फ्रंट सीट रिक्षा : ८३०

  • सिग्नल जंप : ७७६

  • काळी काच : ५११

  • परवाना/ लायसेंस नसलेली रिक्षा : ३८४

  • जादा प्रवासी : ३८२

अवैध पार्किंगला आळा घालण्यासाठी शहरात टोईंग कारवाई अधिक कडक करण्यात येणार आहे. मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स व इतर मोठ्या आस्थापनांना योग्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या मदतीने सतत ई-चलन कारवाई सुरू राहणार आहे. सर्व नाशिककरांनी वाहतूक नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.
अद्विता शिंदे, सहा. पोलिस आयुक्त, नाशिक शहर

41 रिक्षा थेट ‘स्क्रॅप’मध्ये

आरटीओ आणि वाहतूक विभागाच्या संयुक्त कारवाईत ४६२ रिक्षांवर कारवाई करत ४१ रिक्षा स्क्रॅप करण्यात आल्या. सर्व प्रकरणांमध्ये दंडाची रक्कम ई- चलनद्वारे ऑनलाईन आकारण्यात आली. आगामी सिंहस्थ कुंभमेळा २०२७ लक्षात घेता शहरात मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्ती, पाईपलाईन, केबल टाकण्याची कामे तसेच ३० रस्ते आणि ४ उड्डाणपुलांचे काम हाती घेतले जाणार आहे. या कामांदरम्यान वाहतूक सुरळीत राहावी म्हणून मनपा, राष्ट्रीय महामार्ग आणि स्मार्टसिटीच्या ट्रॅफिक वॉर्डनची मदत घेऊन पंक्चर व डायव्हर्जन पॉईंटवर वाहतूक व्यवस्थापन केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT