नाशिक: नाशिक जिल्ह्यात परतीच्या पावसाने थैमान घातले असून बागलाण तालुक्यात भिंत पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर मालेगाव तालुक्यात वीज पडून 10 मेंढ्यांचा मृत्यू झाला आहे.
बागलाण तालुक्यातील गोराणे गावात भिंत कोसळण्याची घटना घडली. जोरदार पावसामुळे घराची भिंत कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत तिच्यासोबत असलेली आणखी एक महिला गंभीर जखमी झाली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि ग्रामस्थांनी मदतकार्य सुरू केले.
नांदगाव तालुक्यात वीज कोसळून प्राणीहानी झाली आहे. मौजे मळगाव (ता. मालेगाव) येथील समाधान कैलास वाकळे (वय १६) हा दुपारी साडेपाचच्या सुमारास मेंढ्या चारत असताना अचानक विजेचा कडकडाट झाला. त्यात समाधान वाकळे गंभीर जखमी झाला. त्यांच्यावर मालेगाव येथील संकल्प रुग्णालयात उपचार सुरू आहे.