जरांगे समर्थक आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा pudhari news network
नाशिक

Nashik | समाेरासमोर येताच जरांगे समर्थक आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा

पुढारी वृत्तसेवा

येवला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी येवला शहरामध्ये केलेल्या ऐतिहासिक धर्मांतर घोषणेच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त मुक्तिभूमीवर अभिवादन करण्यासाठी मराठा योद्धा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील आले होते. यावेळी जरांगे समर्थक आणि भुजबळ समर्थकांमध्ये राडा झाला.

यावेळी मनोज जरांगे यांनी येवला शहरातील शिवसृष्टीला भेट दिली. याप्रसंगी छगन भुजबळ यांचे समर्थकही याठिकाणी उपस्थित होते. मनोज जरांगे पाटील या परिसरात दाखल होताच, दोन्ही गटाच्या समर्थकांकडून एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जरांगे एका सभेच्या कार्यक्रमासाठी हजेरी लावण्यासाठी गेल्यावर शिवसृष्टीच्या ठिकाणी जास्तच राडा झाला, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. रविवारी (दि.13) रोजी साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला.

दरम्यान, या घटनेनंतर छगन भुजबळ यांच्या समर्थकांनी मनोज जरांगे यांचे पोस्टर फाडले असून मनोज जरांगे यांना उद्देशून शिविगाळ केली, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थकांनी माध्यमांशी बोलताना केला. तसेच छगन भुजबळ यांच्या समर्थकांवर कारवाई करावी, अशी मागणी करत त्यांनी शिवसृष्टी परिसरातच ठिय्या आंदोलन सुरु केली. याशिवाय काही मराठा कार्यकर्त्यांनी मनमाड-नगर महामार्गही रास्तारोको आंदोलन केलं आहे. जोपर्यंत छगन भुजबळ यांच्या समर्थकांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही घरी जाणार नाही, अशी भूमिका या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांची समजूत काढत शांतता राखण्याचं तसेच आंदोलन थांबवण्याचं आवाहन केलं आहे. त्यानंतर मराठा आंदोलकांनीही मनोज जरांगे यांच्या विनंतीला मान देत आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT