नाशिक : शहरातील जीवनमान सुधारण्याबरोबरच पर्यावरणपूरक विकासाला चालना देण्यासाठी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या 'एस सिटीज्' या जागतिक उपक्रमात नाशिकच्या समावेशासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याची घोषणा महापौर हिमगौरी आहेर आडके यांनी केली आहे. या उपक्रमांतर्गत नाशिकला अत्याधुनिक तंत्रज्ञान, जागतिक गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन लाभणार असून, यामुळे आर्थिक संधी, रोजगारनिर्मिती आणि हवामान बदलाचा सामना करण्याची क्षमता वाढेल, असा विश्वास महापौरांनी व्यक्त केला आहे.
जिनिव्हा येथे आयोजित जागतिक महापौर परिषदेहून परतलेल्या महापौर हिमगौरी आहेर आडके यांचे स्वागत शुक्रवारी (दि. १६) महापौर निवासस्थान 'रामायण' येथे फटाक्यांची आतषबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात करण्यात आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत महापौरांनी महापौर परिषदेतील अनुभव कथन करताना वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमला दिलेली भेट आणि त्यांच्यामार्फत शहरांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांविषयी माहिती दिली. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमतर्फे 'यस सिटीज्' या जागतिक उपक्रमांतर्गत जगभरातील ५० हून अधिक शहरांची निवड करण्यात येत आहे.
मेट्रो, सिंगापूरची सिस्टर सिटी
नाशिकच्या विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण गरजेचे आहे. यासाठी मेट्रोसह विविध योजनांची अंमलबजावणी सक्षमतेने केली जाईल. सिंगापूरबरोबर सिस्टर सिटीचा करार केला जाणार असून, कराराच्या मसुद्यासाठी एसओपी तयार केली जाणार असल्याचे महापौर आहेर - आडके यांनी सांगितले. जागतिक महापौर परिषदेनिमित्त जगभरातील प्रमुख शहरांच्या महापौरांना तसेच पदाधिकाऱ्यांना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही महापौरांनी दिली.
मोदी, फडणवीस, महाजनांचे आभार!
महापौर आहेर - आडके यांनी सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नाशिकचे नाव उंचावण्याची, भारतीय संस्कृतीचे पान उलगडण्याची आणि जगभरातील विविध शहरांमधील महापौरांसमवेत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मी आभार मानते. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन, येथील प्रथा, परंपरा, विकासाच्या संधी ऐकून जगभरातील महापौर अवाक झाल्याचे महापौरांनी सांगितले. कालावधीत शहरी भागातील जीवनमान सुधारणे आणि पर्यावरणपूरक विकासाला चालना देणे हा आहे.
मेट्रो, सिंगापूरची सिस्टर सिटी
नाशिकच्या विकासासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे सक्षमीकरण गरजेचे आहे. यासाठी मेट्रोसह विविध योजनांची अंमलबजावणी सक्षमतेने केली जाईल. सिंगापूरबरोबर सिस्टर सिटीचा करार केला जाणार असून, कराराच्या मसुद्यासाठी एसओपी तयार केली जाणार असल्याचे महापौर आहेर - आडके यांनी सांगितले. जागतिक महापौर परिषदेनिमित्त जगभरातील प्रमुख शहरांच्या महापौरांना तसेच पदाधिकाऱ्यांना नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे निमंत्रण देण्यात आल्याची माहितीही महापौरांनी दिली.
मोदी, फडणवीस, महाजनांचे आभार !
महापौर आहेर - आडके यांनी सांगितले की, या परिषदेच्या माध्यमातून जागतिक स्तरावर नाशिकचे नाव उंचावण्याची, भारतीय संस्कृतीचे पान उलगडण्याची आणि जगभरातील विविध शहरांमधील महापौरांसमवेत विचारांची देवाणघेवाण करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री गिरीश महाजन यांचे मी आभार मानते. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन, येथील प्रथा, परंपरा, विकासाच्या संधी ऐकून जगभरातील महापौर अवाक झाल्याचे महापौरांनी सांगितले.
एआयच्या माध्यमातून मंदिरांचा इतिहास उलगडणार !
परिषदेतील विविध विषयांवरील परिसंवादांविषयी माहिती देताना सिंहस्थ कुंभमेळ्यातील गर्दी नियोजनासाठी तंत्रज्ञानाचा वापर, एआयच्या माध्यमातून मानवी जीवनमान उंचावण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले. विशेषतः एआयच्या वापरातून मंदिरांची संस्कृती, इतिहास जागतिक स्तरावर नेणे शक्य असल्याचे महापौर म्हणाल्या. पर्यटन विभागाच्या माध्यमातून ग्लोबल स्पिच्युअल सिटी, जागतिक पातळीवरील तंत्रज्ञानाच्या आधारे नदी स्वच्छता, ग्लोबल स्कूल ऑफ डिप्लोमसी जिनिव्हाच्या भारतातील केंद्राच्या माध्यमातून विद्यापीठांची निर्मिती, बांधकाम, उद्योग क्षेत्राला नवसंजीवनी देण्याचे प्रयत्न केले जातील, असेही महापौरांनी सांगितले.