नाशिक

Nashik news | नाशिकमध्ये खासगी क्लासमधील मुलांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह, पालक अस्वस्थ

या बैठकीस देवळा शहरातील सर्व खासगी क्लासेसचे संचालक तसेच अकॅडमीचे संचालक उपस्थित होते

पुढारी वृत्तसेवा

देवळा : देवळा येथील एका नामांकित खासगी क्लासच्या संचालकाची अश्लील चित्रफित सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकारामुळे पालकवर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

या पार्श्वभूमीवर शनिवारी संतप्त पालकांनी सामजिक कार्यकर्ते योगेश आहेर यांच्या नेतृत्वाखाली देवळा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांची भेट घेउन निवेदन दिले. यावेळी पालकांनी आपल्या पाल्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंता व्यक्त करत तातडीने ठोस उपाययोजना राबविण्याची मागणी केली. या बैठकीस देवळा शहरातील सर्व खासगी क्लासेसचे संचालक तसेच अकॅडमीचे संचालक उपस्थित होते.

घटनेची दखल घेत पोलीस निरीक्षक सार्थक नेहेते यांनी खासगी क्लास संचालकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कडक सूचना दिल्या. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत, यासाठी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आले. या घटनेनंतर देवळा शहरात खासगी क्लासेसच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासन व पालकवर्ग यापुढे कितपत कठोर पावले उचलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावेळी मविप्र संचालक विजय पगार, पंकज आहीरराव, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप आहेर, जीभाऊ शिंदे ,प्रहारचे उमेश आहेर, अॅड. रितेश निकम,राजेंद्र आहेर ,शिवसेनेचे विश्वनाथ गुंजाळ, बापू आहेर, काकाजी आहेर, संदीप आहेर आदींसह पालक व नागरीक उपस्थित होते.

@ पालकांच्या प्रमुख मागण्या

  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थीनींना स्कार्फने चेहरा झाकण्यास बंदी घालावी.

  • प्रत्येक खासगी क्लासमध्ये सोसीटव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात यावेत.

  • प्रत्येक खासगी क्लासमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करून विद्यार्थ्यांच्या ये-जा वेळेचा डेटा रोज तपासण्यात यावा.

  • खासगी क्लासमधील सीसीटिव्हिचा डेटा थेट पोलीस स्टेशनमध्ये उपलब्ध असावा.

  • सर्व खासगी क्लासेसची वेळ सायंकाळी ७ वाजेपर्यंतच मर्यादित ठेवावी.

  • डी कॉलेज भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस भरारी पथक कार्यरत ठेवावे.

  • शहरात रोडरोमियोंवर पोलीस प्रशासनाने ठोस व कठोर कारवाई करावी.

  • विद्यालय व महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेस शहरातील मुख्य भाग — बस स्थानक, पाच कंदील चौक व महाविद्यालय परिसरात पोलीस कर्मचारी नेमावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT