वीजपुरवठा बंद file photo
नाशिक

Nashik Power Off : नाशिककर या चार दिवसात वीजपुरवठा राहणार बंद

वडाळा, अशोका रोड भागात वीजपुरवठा बंद; विद्युत खांब व रोहित्र स्थलांतरणासह, वीजवाहिनी भूमिगत होणार

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महावितरणच्या नाशिक शहर विभाग २ अंतर्गत असलेल्या द्वारका उपविभागातील इंदिरानगर कक्षांतर्गत असलेल्या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातून निघणाऱ्या भारतनगर, कल्पतरूनगर, डीजीपीनगर या ११ केव्ही उच्चदाब वीजवाहिन्यांतर्गत असलेल्या वीजवाहिन्या भूमिगत करण्यात येणार आहेत.

रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब व रोहित्र नाशिक स्मार्ट सिटीच्या वतीने स्थलांतरित करण्यात येणार आहेत. त्यामुळे दि. ८ ते १० जुलै दरम्यान सलग तीन दिवस दररोज सकाळी १० ते दुपारी २ यावेळेत तसेच शनिवारी (दि. १२) सकाळी ९ ते सायंकाळी ५ यावेळेत वीजपुरवठा बंद राहणार आहे.

नाशिक स्मार्ट सिटी विद्युत संदर्भात करीत असलेल्या या कामामुळे भारतनगर वाहिनी अंतर्गत खोडेनगर, विठ्ठल मंदिर, वडाळा गाव, गणेशनगर, रहमतनगर, रविशंकर मार्ग या भागातील वीजपुरवठा बंद राहणार आहे. कल्पतरूनगर वाहिनी अंतर्गत अशोका मार्ग, गोदावरीनगर, कुरूडकरनगर, बनकर मळा, मातोश्री कॉलनी, निसर्ग कॉलनी, पखाल रोड, गोरे हॉस्पिटल, विधातेनगर, विठ्ठल मंदिर, पंडित रविशंकर मार्ग आणि डीजीपीनगर वाहिनीअंतर्गत साई संतोषीनगर, एस एन पार्क, साठेनगर, मदिनानगर, सादिकनगर, गुलशननगर, मुमताजनगर, म्हाडा कॉलनी, वडाळा गाव, मेहबूबनगर या भागांत वीजपुरवठा बंद राहणार आहे. वीजवाहिनी भूमिगत करण्याचे काम नियोजित वेळेअगोदर पूर्ण झाल्यास वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्यात येईल. याची ग्राहकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या शहर विभाग २ कडून करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT