नाशिक : राजगड येथे आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना दिनकर पाटील. Pudhari News Network
नाशिक

Nashik Politics : महापालिकेत मनसेची स्वबळाची तयारी

31 प्रभागांचा आढावा : इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी महापालिका निवडणुकीत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याचे जवळपास निश्चित असले तरी, याबाबत वरिष्ठ स्तरावरून कोणताही अधिकृत आदेश प्राप्त न झाल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने स्थानिकस्तरावर स्वबळाची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांनी शनिवार (दि. ८) स्थानिक पदाधिकाऱ्यांसमवेत राजगड येथे बैठक घेत सर्व ३१ जागांचा आढावा घेतला. तसेच इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेशही दिले. दरम्यान, मनसेनी जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपरिषदांमध्ये यापूर्वीच स्वबळाचा नारा दिलेला आहे.

नगरपालिका आणि नगरपरिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता जिल्हापरिषद आणि महापालिका निवडणुकांही लवकरच घोषित केल्या जाण्याची शक्यता आहे. यापार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून, तुर्त महायुती आणि महाविकास आघाडीचा विचार न करता स्वबळाची तयारी सुरू केली आहे. आगामी निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा असल्याने, महापालिकेत 'ठाकरे पॅटर्न' एकत्र दिसण्याची शक्यता आहे. मात्र, याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नसल्याने, दोन्ही सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, ठाकरे बंधु एकत्र येण्याबाबतचा निर्णय होणे बाकी असल्याने, मनसेकडून स्थानिक स्तरावर सर्व ३१ प्रभागांमध्ये उमेदवार उभे करण्याची रणनिती आखली जात आहे. प्रदेश सरचिटणीस पाटील यांनी, सर्व प्रभागांचा आढावा घेताना इच्छुकांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे विचार, तसेच मनसेनी सत्ता काळात केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आदेश त्यांनी इच्छुकांना दिले आहेत. प्रत्येक प्रभागातील मतदान याद्यांवर काम करा, सर्व ३१ प्रभागात मनसे ताकदीने उतरणार आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

बैठकीस प्रदेश उपाध्यक्ष सलीम शेख, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष सुदाम कोंबडे, शहर समन्वयक भाऊसाहेब निमसे, महिला सेना प्रदेश उपाध्यक्ष सुजाता डेरे, जिल्हा उपाध्यक्ष नामदेव पाटील, संतोष पिल्ले, मनोज घोडके आदी उपस्थित होते.

Nashik Latest News

स्वबळाचा डाव, महाविकास आघाडीसाठी धाव

मनसेकडून स्वबळाची चाचपणी केली जात असली तरी, भाजपसह महायुतीतील शिंदे सेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मोठे आव्हान समोर आहे. त्यामुळे मनसेकडून स्वबळाचा डाव खेळला जात असला तरी, त्यांची महाविकास आघाडीसाठी धावाधाव सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी सोमवारी (दि.१०) मनसे, ठाकरे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, कम्युनिस्ट डावे पक्ष, वंचित आदी पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. यावेळी आगामी निवडणुकांमध्ये या सर्व पक्षांची भूमिका पत्रकार परिषदेत जाहीर केली जाण्याचीही शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT