नाशिक

नाशिक : जुने नाशिकच्या मतदान केंद्रावर राजकीय वातावरण तापले, आजी माजी आमदारात शाब्दीक चकमक

अंजली राऊत

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क – भाजपच्या आमदार देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गीते यांच्यामध्ये जुने नाशिक परिसरातील मतदान केंद्रावर शाब्दीक चकमक झाली. माजी आमदार वसंत गीते व भाजपच्या सत्ताधारी आमदार देवयानी फरांदे हे समोरासमोर आल्याने त्यांच्यात वाद निर्माण झाल्याने मतदारांची गर्दी झाली. दोन्ही गटाचे कार्यकर्ते जुने नाशिक परिसरात समोरासमोर आले असताना वाजे गट उद्धव ठाकरे शिवसेना व शिंदे सेना गट आणि भाजपाचे कार्यकर्त्यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली होती. परिस्थिती तणावग्रस्त झाल्याने पोलीसांनी मध्यस्थी करत मतदान केंद्रावरील वातावरण सुरळीत केले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT