Pollution Case Juloos Gausia Pudhari File Photo
नाशिक

Pollution Case Juloos Gausia | नाशिकमध्ये 'जुलूस गौसिया' मिरवणुकीत डीजेचा दणदणाट; भद्रकालीतील 5 मंडळांवर गुन्हे दाखल

Pollution Case Juloos Gausia | मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकांचा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज झाल्याचे आढळल्याने संबंधित मंडळांवर कारवाईची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जुलूसिया मिरवणुकीदरम्यान ध्वनिप्रदूषणाच्या निर्धारित मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच मंडळांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलिस यंत्रणेने सुरू केली आहे. मिरवणुकीदरम्यान ध्वनिक्षेपकांचा निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाज झाल्याचे आढळल्याने संबंधित मंडळांवर कारवाईची प्रक्रिया राबवण्यात येत आहे.

गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीतही ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. भद्रकाली, सरकारवाडा आणि देवळाली कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या एकूण ३६ गणेश मंडळांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

त्यामुळे उत्सव आणि मिरवणुकांमध्ये ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे पालन करण्याबाबत पोलिस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. उच्च न्यायालयाने ध्वनिप्रदूषणासंदर्भात निर्धारित नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पोलिस यंत्रणेने मिरवणुकांदरम्यान ध्वनी पातळीचे परीक्षण करण्यास सुरुवात केली आहे.

संबंधित मंडळांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास त्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जात आहे. कारवाईची प्रक्रिया थेट गुन्हा दाखल करण्यापासून सुरू होत नसून, त्यासाठी निर्धारित पद्धतीचा अवलंब केला जात आहे. सर्वप्रथम मिरवणुकीदरम्यान संबंधित मंडळाकडून होणाऱ्या ध्वनीची पातळी मोजून त्याचे नमुने घेण्यात येतात. हे नमुने तपासणीसाठी पाठवले जातात.
ध्वनीची पातळी निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर संबंधित मंडळाला पोलिसांकडून नोटीस बजावण्यात येते. त्यानंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा जबाब नोंदवून घेण्यात येतो.

नोटीस, ध्वनी नमुना तपासणीचा अहवाल आणि संबंधितांचा जबाब या सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात धार्मिक, सामाजिक अथवा सांस्कृतिक मिरवणुकांमध्ये ध्वनिक्षेपकांच्या वापराबाबत मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.
या मंडळांवर कारवाई:

  • के के ग्रुप

  • बगदादी फ्रेंड सर्कल

  • नाइन टू नाइन बॉइज

  • रजा ग्रुप

  • एफ एम बॉइज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT