पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव पोलिसांनी मुद्देमालासह पकडलेले कांदा चोर Pudhari
नाशिक

Nashik Onion Theft | रात्री कांदा चोरणारे तिघे जेरबंद, पिंपळगावमधील घटना

सहा लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत: कांदा व्यापाऱ्याच्या खळ्यावरून रात्री कांदा चोरणाऱ्या तिघांना पिंपळगाव पोलिसांनी काही तासांत अटक केली. त्यांच्याकडून 46 कांद्याच्या गोण्या तसेच छोटा हत्ती व मोटारसायकल असा एकूण सहा लाख 97 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील कांदा व्यापारी दीपक गायधनी यांच्या खळ्यावरून बुधवारी पहाटेच्या सुमारास पिंपळगाव बसवंत येथील तिघांनी एका व्यापाऱ्याच्या खळ्यामधून 46 गोण्या कांदे चोरले. चोरलेला माल घेऊन जात असताना गस्तीवर असणाऱ्या पोलिसांना या तिघांबाबत संशय आला. त्यांना चिंचखेड चौफुलीजवळ त्यांना थांबवून वाहन तपासले असता कांद्याच्या गोण्या आढळल्या. त्याबाबत त्यांना व्यवस्थित माहिती देता न आल्याने तिघांना पिंपळगाव पोलीस ठाण्यात नेले. चौकशीदरम्यान त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव, पोलीस हवालदार निलेश जाधव, राहुल गांगुर्डे, बाबा पगारे आदींनी ही कारवाई केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT