16 हजार टन कांद्याला युद्धाचा फटका pudhari photo
नाशिक

Nashik onion exporters crisis : 16 हजार टन कांद्याला युद्धाचा फटका

३६ कोटींचे नुकसान

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : अमेरिका, इराण आणि इस्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे थेट परिणाम आता महाराष्ट्रासह नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक आणि निर्यातदारांवर दिसून येत आहेत. नाशिकसह महाराष्ट्रातील कांदा निर्यातदारांचा 550 हून अधिक कंटेनरमध्ये भरलेला कांदा निर्यातीअभावी अडकून पडला आहे. हा कांदा प्रामुख्याने दुबईमार्गे आखाती देशांत निर्यात होतो. मात्र, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे दुबईतील मार्केट पूर्णपणे ठप्प आहे.

दुबई येथे माल स्वीकारला जात नसल्याने अंदाजे 16 हजार टन कांदा कंटेनरमध्ये अडकून पडला असल्याची माहिती समोर आली आहे. या कांद्याची किंमत 36 कोटी असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. एक-दोन दिवसांत यावर तोडगा न निघाल्यास कांदा सडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि व्यापारी चिंतेत सापडले आहेत.

इराण, इस्रायल व अमेरिका युद्धामुळे महाराष्ट्रातील कांद्याचे तब्बल 550 कंटेनर बंदरात अडकवून पडले आहेत. बंदराबाहेर अडकून पडलेला कांदा अन्‌‍ त्यांच्या खर्चाचे काय करायचे असा प्रश्न कांदा निर्यातदारांना पडला आहे. शनिवारपासून दुबईतील बंदर बंद करण्यात आले. रविवारपासून जहाज कंपन्यांनी बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे बंदराबाहेर असलेले कांदा कंटेनर तसेच उभे आहेत. बंदरात व बंदराबाहेर अडकलेल्या कांद्यावर होणारा अतिरिक्त खर्च किंवा अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी व्यापाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

दुबईप्रमाणे मुंबईच्या बंदरात महाराष्ट्रातील अडकलेल्या कंटेनरमध्ये १६ हजार टन कांदा अडकला असून, त्याची किंमत ही ३६ कोटींपर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. रमजान ईदच्या निमित्ताने दुबई, ओमान, सौदी अरेबिया, बहरीन, कतार या देशांना कांद्याची निर्यात करण्यात आली आहे. निर्यातीत ४ ते ८ टक्के हिस्सा असलेला गुजरातमधील पांढरा कांदा असतो. मात्र, निर्यात बंद असल्याने निर्यातीचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुबईमधील बंदर दोन तासांसाठी सुरू केले होते. मात्र, आखाती देशांमधील युद्ध पेटले असल्याने कांदा निर्यातदारांपर्यंत कधी पोहोचणार असा प्रश्न आहे. युद्धावर काही तोडगा निघाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटू शकतो, असे आशावाद निर्यातदारांनी व्यक्त केला आहे.

जिल्ह्यातील बाजार समित्या बंद

होळीनिमित्त जिल्लागतील कृषी उत्पन्न बाजार समित्या दोन दिवस बंद आहेत. पिंपळगाव बाजार समितीत लेट खरीप लाल कांद्याला सरासरी ८७० भाव मिळत आहे. आणखी लाल कांदा दोन आठवड्यात बाजारात येऊ शकतो. कांद्याची आवक वाढल्यास कांद्याचे भाव कोसळू शकतात असा अंदाज आहे.

युद्धामुळे बंदरात एकूण १५० १५० ते २०० कांद्याचे कंटेनर अडकलेले आहेत. युद्धावर अद्याप तोडगा निघालेला नाही. मात्र, अडकलेल्या कांद्यावर तोडगा काढण्यासाठी बुधवारी अपेडा या निर्यातदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत चर्चा होईल.
विकासकुमार सिंह, उपाध्यक्ष, एक्सपोर्ट असोसिएशन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT