राज्यातील १३८ उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्या  Pudhari File Photo
नाशिक

Nashik Officers Transfer : जिल्ह्यातील सात 'बीडीओं'च्या बदल्या

नाशिक : जिल्ह्यातील 7 गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या !

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सात गटविकास अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवण, मालेगाव, बागलाण, त्र्यंबक, निफाड, दिंडोरी आणि नांदगाव या तालुक्यांचा समावेश आहे. या ठिकाणी इतर जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांच्या नेमणुका झाल्या आहेत.

अधिकाऱ्यांची बदली झाल्याने जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व अधिकाऱ्यांना कार्यमुक्त केले आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, महाराष्ट्र विकास सेवेतील गटविकास अधिकारी संवर्गाच्या बदल्या करण्यात आल्या. त्यामध्ये नाशिक जिल्ह्यातील सात पंचायत समित्यांमध्ये कार्यरत गटविकास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या रिक्त झालेल्या जागांवर शासनाने तत्काळ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

जिल्ह्यात आलेले अधिकारी (कंसात तालुका)

  • आर. ओ. वाघ (कळवण)

  • सी. सी. साबळे (मालेगाव)

  • ए. जे. पाटील (बागलाण)

  • जी. एम. लेंडी (त्र्यंबकेश्वर)

  • टी. बी. जाधव (निफाड)

  • बी. एस. रेंगडे (दिंडोरी)

  • डी. ए. कोतवाल (नांदगाव)

  • एस. जी. पाठक (सहायक, नांदगाव)

जिल्ह्यातून गेलेले अधिकारी (कंसात बदली स्थळ)

  • एन. एस. पाटील (जावळी, सातारा)

  • ए. जी. पवार (धरणगाव, ज‌ळगाव)

  • लता गायकवाड (मुरबाड, ठाणे)

  • श्रीकिसन खातळे (अंजनगाव सुर्जी, अमरावती)

  • महेश पाटील (चोपडा, जळगाव)

  • नम्रता जगताप (शहापूर, ठाणे)

  • संदिप द‌ळवी (कोपरगाव, नगर)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT