Nashik Municipal Corporation Pudhari Photo
नाशिक

Nashik NMC News | क्लब टेंडरींगमुळे मनपात २०० कोटींचा घोटाळा?

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : महापालिकेतील बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांच्या संगनमताने क्लब टेंडरींगच्या (Club Tender) माध्यमातून दोनशे कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी प्रशांत दैतकार पाटील यांनी केली आहे.

महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत आरोग्यवर्धिनी केंद्र उभारणी, अंगणवाड्यांची दुरूस्ती, महापालिकेच्या मालकीच्या इमारतींची दुरूस्ती, रस्ते बांधणी आदी कामांसाठी स्वतंत्र निविदा प्रक्रिया राबविणे गरजेचे असताना एकत्रित निविदा प्रक्रिया राबविली जाते. विशिष्ट ठेकेदारालाच सदर कामे मिळावी यासाठी निविदा अटीशर्थी निश्चित केल्या जातात. स्पर्धा होऊ नये यासाठी तांत्रिक छाननीत अपात्र ठरवून मर्जीतील ठेकेदारांना चांगल्या दराने कामे कशी मिळतील याचे नियोजन अधिकाऱ्यांकडून केले जाते. गेल्या पाच वर्षात निविदा प्रक्रियेत साखळी झाल्याची कामे सुमारे हजार कोटींच्या घरात आहेत. (Club Tender) याद्वारे महापालिकेचे सुमारे दोनशे कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान केले गेले. आयुक्तांकडे या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी केली असता बांधकाम विभागाने सदर कामांना आयुक्तांचीच मंजुरी असल्याचे सांगत भ्रष्टाचार झाल्याबाबत पुरावे सादर करण्याची मागणी केली. ज्या विभागातील अधिकाऱ्यांविरोधात चौकशीची मागणी केली जात आहे. त्याच अधिकाऱ्यांकडे चौकशीची सूत्रे सोपविली जातात, हे आश्चर्यकारक असून त्रयस्थ समितीमार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT