नाशिक : जे. पी. फिटनेस क्लब आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव तसेच 'मेन्स फिजिक स्पर्धेत जे. पी. फिटनेस क्लासिक- 2024 चा किताब' अजय निषादने पटावला. दोन वेळेस जिल्हास्तरीय किताबावर नाव कोरणाऱ्या रवी बागडेला उपविजेत्यापदावर समाधान मानावे लागले. संगीताच्या तालावर पुष्ठ आणि दणकट भरीव स्नायूंचे लयबद्ध प्रदर्शन करून गौरव सांगळेने बेस्ट पोजरच्या किताबावर नाव कोरले.
इंडियन बाॅडीबिल्डर्स फेडरेशन व महाराष्ट्र बाॅडी बिल्डींग असोसिएशन संलग्न नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेच्या मान्यतेने स्पर्धा खेळवण्यात आली. पंचवटीतील बाप्पा सीताराम रोड येथील त्रिमूर्ती नगर येथे पहिल्यांदाच शरीरसाैष्ठव स्पर्धा भरवण्यात आल्या. उद्घाटन जयंत पवार, प्रथमेश पवार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी नाशिक जिल्हा हौशी शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस गोपाळ गायकवाड, उपाध्यक्ष रोडे, रवींद्र वर्पे, किशोर जाधव, राहुल वाघ आदी मान्यवर उपस्थित हाेते.
स्पर्धा विविध गटात घेण्यात आली जिल्ह्यातील सर्व भागातील एकूण 94 सौष्ठवपटूंनी त्यात सहभाग नोंदवला. पंच म्हणून राष्ट्रीय पंच गोपाळ गायकवाड, गोपीनाथ रोडे, रवींद्र वरपे, श्रीराम जाधव, दिनेश भालेराव, राहुल पंडित, अमोल जाधव, सुबोध जगताप यांनी काम पाहिले. गुणलेखन हिमांशू गायकवाड यांनी केले. स्टेज मार्शल रामदास पोमनार, चेतन धसे, बॅक स्टेज मार्शल सुभाष घुगे, अनंत कदम, सिध्देश वर्पे यांनी केले.
अभिषेक वेनलू, कुणाल झाल्टे, हर्षल मगर, अतुल बनसोड, सुमित सोनवणे, रवि भागडे, मनोज अडोळ, योगेश भोर, माजिद सैय्यद, मोझम खान, सुयश चौधरी, रोशन जाधव, आशुतोष पगारे, रोहित विसे, अजिंक्य गावडे, अजय निशाद, हर्षल हांडेगे, साहिल शेख, किरण बोराडे, मस्तराम निसाद, राकेश देवरे, गौरव सांगळे, बंटी बाविस्कर, अथर्व सासवडे, मनोज ससान, रूतिक गाडेकर, अजय जगताप, राहुल घोलप, हर्षल वाघ, रवी बागडे (संपूर्ण स्पर्धेचा सर्वसाधारण विजेता).