Bachchu Kadu (बच्चू कडू) Member of the Maharashtra Assembly pudhari file photo
नाशिक

नाशिक : निफाडला आज आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा

पुढारी वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : प्रहार संघटना आगामी विधानसभा आखाड्यात उतरणार आहे. यासाठी आमदार बच्चू कडू जिल्ह्यातील पक्षाची ताकद तपासून पाहणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. १८) निफाड येथील देवकृपा लॉन्स येथे बच्चू कडू यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यात शेतकरी, दिव्यांग, कष्टकरी, शेतमजूर यांच्या प्रश्नांवर आमदार बच्चू कडू बोलणार आहेत. या मेळाव्यात उमेदवार देखील शेतकरी मेळाव्यात जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. तसेच मेळाव्यात कडू काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मेळाव्याला निफाड, चांदवड, देवळा, येवला, सिन्नर तालुक्यांतील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT