नाशिक : "मिशन महिला सबलीकरण" आय-जिनियस टीचर ट्रेनिंग प्रोग्रामच्या अंतर्गत 2023-24 या शैक्षणिक वर्षी राज्यासह शहरातील व ग्रामीण भागातील सुशिक्षित पदवीधर महिला, उच्चशिक्षित गृहिणी अशा महिलांना ॲबॅकस व वैदिक गणित या विषयांचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःचे ॲबॅकस सेंटर स्थापन करण्यासाठी सुरुवात करण्यात आली. अशा महिलांना आय-जिनियस या सरकारी अधिकृत फ्रंचाइसी प्रमाणपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
प्रयास शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्थाअंतर्गत आय-जिनिअस ॲबॅकस अकॅडमी ही संस्था गेल्या 16 वर्षांपासून ॲबॅकस, वैदिक गणित, रुबिक क्युब, चेस या नवीन शिक्षणपद्धतीचे प्रशिक्षण देत आहे. महाराष्ट्रातील नामांकित शिक्षण संस्था "मराठा विद्या प्रसारक समाज", नाशिक या संस्थेतील मराठी माध्यम प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना या कोर्सद्वारे ॲबॅकस व वैदिक गणित या विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे. त्यानुसार बेस्ट मास्टर फ्रंचाइसी, बेस्ट लीडर्स, बेस्ट टीचर्स अशा सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या सर्व प्रशिक्षक व फ्रंचाइसींना प्रोत्साहन देत सन्मानित करत भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. आय-जीनियस अकॅडमी च्या संचालिका निता पवार यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. रोशनी पवार यांनी सूत्रसंचालन केले. प्रिया यांनी आभार मानले.
कार्यक्रमाप्रसंगी नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, वंदना ठाकरे, , डॉक्टर विजयाताई गायकवाड मॅडम तसेच मंदाकिनी लांडगे मॅडम सुजाता शिंदे, मविप्र अभिनव बालविकास मंदिर गंगापूर रोडच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गायधनी, उदोजी होरायझनच्या मुख्याध्यापिका नेहा सोनवणे मॅडम होरायझन अकॅडमी आय.सी.एस.सी मुख्याध्यापिका निधी मिश्रा, मॅडम ओझर येथील होरायझन अकॅडेमीच्या मुख्याध्यापिका मीरा पांडे हे मान्यवर उपस्थित होते.
या प्रोत्साहनपर पुरस्कार वितरण कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून जसे मुंबई , पुणे, संभाजीनगर... बीड.... जालना. नागपूर, कल्याण, नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्याचे नवीन टीचर व लीडर्स आय जिनियस ग्रुप सदस्यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला आहे. यामध्ये 108 महिलांना आय-जिनिअस टीचर ट्रेनिंगचे प्रमाणपत्र देण्यात आले. तर 102 गुणवंत प्रशिक्षकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या शिक्षकांच्या अथक परिश्रमातून त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा आणि राज्यस्तरापर्यंत उत्तम प्रशिक्षण दिल्याने आय जिनियस आज गगनभरारी घेत आहे.नीता पवार, आय-जिनिअस ॲबॅकस अकॅडमीच्या संचालिका, नाशिक.