नाशिक : आमदार-खासदारांनी सूचविलेल्या ५० कामांपैकी ३० ते ३५ कामे नियमात बसतात. उर्वरित कामे नियमात बसवून घ्यावी लागतात. हे करताना आपण कागदात पक्के असले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांना डुप्लिकेट प्रमाणपत्र देण्यासाठी त्याला आधी पोलिसांत तक्रार देणे गरजेचे आहे. त्यासाठी मुख्याध्यापकांचा बारीक अभ्यास असला पाहिजे, अशा सूचना शिक्षण संस्थांना देण्यात आल्या.
गंगापूर रस्त्यावरील कै. रावसाहेब थाेरात सभागृहात मुख्याध्यपकांची सहविचार सभा पार पडली. त्यावेळी व्यासपीठावर एसएससी बोर्डाचे अध्यक्ष डाॅ. सुभाष बोरसे, सचिव मोहन देसले, सहसचिव मच्छिंद्रनाथ कदम, सहायक सचिव मंदाकिनी देवकर, मुंबई बोर्डाचे अध्यक्ष राजेंद्र आहिरे, माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रविण पाटील उपस्थित होते. इयत्ता बारावीच्या परीक्षा लवकरच सुरू होणार असून त्यापार्श्वभूमीवर शाळांना मार्गदर्शन करण्यात आले. कदम यांनी शाळांनी नेमकी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत सूचना केल्या. एसएससी बोर्डाच्या अधिनस्त शाळांचे काम चालत असून बोर्डाचे नियम शाळांना लागू होतात. परीक्षेला विद्यार्थी केवळ प्रविष्ट करून चालत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्यांची वर्षभरात ८० टक्के उपस्थिती असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांच्या नावातील वर्णाक्षर दुरुस्ती कधीही करता येते. मात्र, नाव, आडनाव बदल मात्र संबंधित विद्यार्थी जोपर्यंत शाळेत आहे, तोपर्यंतच करता येते. त्यामुळे शाळांनी याबाबतीत काळजी घेणे आवश्यक असल्याची सूचना करण्यात आल्या.
- डमी विद्यार्थी बसू नये यासाठी विद्यार्थ्यांचे छायाचित्र तपासून घ्या
- पालकांची बदली झालेली असेल तरच केंद्र बदलावे, त्यासाठी विद्यार्थ्याकडून पुरावा घ्यावा.
- एटीकेटीच्या सुविधेसाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरच अकरावीचा निकाल द्यावा
- परीक्षेच्या काळात गैरप्रकार रोखण्यासाठई भरारी पथके स्थापन करावी
- फी वरून विद्यार्थ्यांची अडवणूक करू नका
- उत्तर पत्रिका मोजून घ्या, त्या शाळेतच तपासा, घरी घेऊन जाऊ