नाशिक

Nashik News | “दोस्तीचा द एन्ड”! दोघा जीवलग मित्रांनी सोबतच जीवनप्रवास थांबवला

अंजली राऊत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा –  दोघा जीवलग मित्रांनी रेल्वेखाली झोकून देत आपला जीवन प्रवास थांबवला आहे.  वालदेवी नदी पुलाजवळ शनिवारी (दि. ८) सायंकाळी ही घटना घडली.

संकेत कैलास राठोड (१७) आणि सचिन दिलीप करवर (१७, दोघे रा. म्हसोबानगर, चेहेडी शिव) असे जीवन प्रवास थांबवल्या प्रकरणी दोघा मित्रांची नावे आहेत. शनिवारी (दि. ८) सायंकाळी चारनंतर संकेत त्याच्या आईला सांगून सचिनसोबत क्रिकेट खेळायला गेला. सायंकाळी सहाच्या दरम्यान दोघेही रेल्वे मालधक्क्याच्या दिशेने रेल्वे क्रॉसिंगजवळ असलेल्या वालदेवी नदीवरील पुलावर गेले. या ठिकाणी संकेत आणि सचिनने धावत्या रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवले. असे करण्याच्या मागे दोघांचे काय कारण होते ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, मोबाइलवर भावपूर्ण श्रद्धांजली असे स्टेटस ठेवून त्यांनी जीवनप्रवास थांबवला असल्याचे समजत आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT