गृह' मंत्रालय बैठक file photo
नाशिक

Nashik News | 'गृह' मंत्रालयाच्या बैठकीची जय्यत तयारी

पुढारी वृत्तसेवा

नाशिक : केंद्रीय गृह मंत्रालयातर्फे नाशिकमध्ये २७ व्या पश्चिम विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी (दि. २) रोजी होणाऱ्या या परिषदेसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे अनुपस्थित राहणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल. त्यामुळे बैठकीची जय्यत तयारी करण्यात येत आहे. (Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India)

आंतर-राज्य परिषद सचिवालयातर्फे (Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India) दरवर्षी पश्चिम विभागीय परिषदेचे आयाेजन करण्यात येते. यंंदाच्या वर्षी सचिवालयाने महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने परिषद घेण्याचे निश्चित केले आहे. परिषदेसाठी नाशिकची निवड करण्यात आली आहे. परिषदेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, गोवा या राज्यांसह दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव प्रदेशाची ही परिषद असणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच संबंधित राज्यांचे मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सदस्य ८० हून अधिक जण उपस्थित राहणार आहेत.

गृह मंत्रालयाच्या आंतर-राज्य परिषद सचिवालयातर्फे (Inter-State Council Secretariat Ministry of Home Affairs, Government of India) दरवर्षी पश्चिम विभागीय परिषद घेण्यात येते. यंदाच्या वर्षी या परिषदेचा मान नाशिकला मिळाला आहे. पाथर्डी फाटा येथील हॉटेल ताजमध्ये बैठक पार पडणार आहे. परिषदेत मुख्यमंत्री शिंदे प्रमुख मार्गदर्शन करतील. महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, दादरा आणि नगर हवेली तसेच दमण आणि दीव प्रदेशाचे मुख्य सचिव, प्रधान सचिव व अन्य सदस्य उपस्थित राहणार आहेत. परिषदेत राज्यांचे सशक्तीकरणासह केंद्र व राज्यांमधील धोरणात्मक आराखडा व संघराज्यवादावर भर देण्यात येईल. याशिवाय पश्चिम विभागीय परिषदेत महिला व बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास, बलात्कार आणि पोक्सो कायद्यातील खटल्यांचा निपटाऱ्यासाठी जलदगती विशेष न्यायालयांच्या योजनेची अंमलबजावणी व सामान्यांच्या समस्यांवर चर्चा होईल. कुपोषणमुक्तीसह अन्यही मुद्देदेखील चर्चिले जाणार आहे. साधारणत: ८० हून अधिक प्रमुख अधिकारी यानिमित्ताने नाशिकमध्ये दाखल होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून बैठकीच्या सूक्ष्म नियोजनावर भर देण्यात आला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT